Vaibhav Pichad Vs Kiran Lahamate : पिचडांना घरवापसीचे तर, लहामटे शरद पवारांच्या संपर्कात? कोणाला 'चान्स' मिळणार...

Politics in Vaibhav Pichad and Kiran Lahamate Akole Constituency : 2019 मधील विधानसभाप्रमाणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यामधील जनतेने सत्ताधारी प्रस्थापितांच्या विरोधात कौल दिला. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांविरोधातच मतदारांचा कौल राहिला आहे.
Vaibhav Pichad Vs Kiran Lahamate
Vaibhav Pichad Vs Kiran Lahamatesarkarnama
Published on
Updated on

Akole Assembly Constituency Politics : कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या अकोले तालुका विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला निर्भेळ मताधिक्य मिळाले. महायुतीचे मताधिक्य घटल्यानं आजी-माजी आमदारांचे टेन्शन वाढले असून, डझनभर इच्छुकांना राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे मुंबईत फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे.

आमदार किरण लहामटे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या संपर्कात आहेत, तर माजी आमदार वैभव पिचड यांच्याकडून देखील घरवापसीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक उलथापालथी होण्याची संकेत मिळू लागले आहेत.

लोकसभेची निवडणूक शिर्डी (Shirdi) मतदारसंघात महायुतीला जड गेली. यात अकोले तालुका विधानसभा मतदारसंघ पहिल्यापासून पुरोगामी विचारांचा. कम्युनिस्टांचा बाल्लेकिल्ला राहिला. या निवडणुकीत महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाला. यावेळच्या निवडणुकीत अकोले तालुक्याने महायुतीला जेवढे मताधिक्य घटले की, महाविकास आघाडीकडील इच्छुकांची संख्या वाढली.

2019 मधील विधानसभाप्रमाणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अकोल्यामधील जनतेने सत्ताधारी प्रस्थापितांच्या विरोधात कौल दिला. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांविरोधातच मतदारांचा कौल राहिला आहे. आजी-माजी आमदार, कारखाना अध्यक्ष, संचालक, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य महायुतीच्या व्यासपीठावर असताना महाविकास आघाडीला यश मिळाले.

महाविकास आघाडीला मिळालेले यश विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांच्या डोक्यात शिरले आहे. आजी-माजी आमदार राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण सुरू झालं आहे. विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे इच्छुकांची तिकीटासाठी गर्दी असणार आहे. काहींनी दोन्ही दगडावर पाय ठेवण्याची कसरत करत असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या मताधिक्यामुळे आजी-माजी आमदार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची आकडेमोड सुरू आहे. भविष्यात कोणाकडून जायचे याचे मनसुभा, आखले जात आहे.

Vaibhav Pichad Vs Kiran Lahamate
Sujay vikhe : घायल शेर की साँसे उसकी दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है! सुजय विखेंची 2029 ला पुन्हा येणारची घोषणा...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत चांगला दबदबा वाढला आहे. अकोले मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणण्याची त्यांनी तयारी केली आहे.

माकप किसान सभेचे राज्य सचिव अजित नवले यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष देखील महाविकास आघाडीकडून तिकीटासाठी इच्छुक आहे. नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे, नामदेव भांगरे इच्छुक आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला माकपने बिनशर्त मदत केली आहे. त्यामुळे विधानसभेला महाविकास आघाडीने माकपला अकोले तालुक्यातून बळ द्यावे, अशी मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात खिचडीच होईल, असे दिसते आहे.

विधानसभा निवडणुकीत अकोले तालुक्यातून डझनभर उमेदवार रिंगणात दिसतील, असेच काहीसे राजकीय चित्र सध्या तरी दिसते.

Vaibhav Pichad Vs Kiran Lahamate
BJP Chitra Wagh On Nilesh Lanke : नीलेश लंकेंच्या विजयाचा 'राक्षसी' पॅटर्न; चित्रा वाघ यांनी सर्वच काढलं...

आमदार डाॅ. किरण लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून फिक्स असणार असल्याचे सांगितले जाते. माजी आमदार वैभव पिचड यांची घरवापसीची चर्चा सुरू आहे. विद्यमान आमदार लहामटे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीच्या प्रचारात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अमित भांगरे, सुनीता भांगरे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मधुकर तळपाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश भांगरे पुढे होते. मधुकर तळपाडे शिवसेना ठाकरे पक्षाच्या तिकीटासाठी मुंबईला तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे सुनीता भांगरे आणि अमित भांगरे यांनी फिल्डिंग लावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com