षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत सागरानंद सरस्वती यांचे निधन

नाशिकच्या कुंभमेळ्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
Mahant Sagaranand Sarswati
Mahant Sagaranand SarswatiSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील श्री. पंच दशनाम आनंद आखाडयाचे (Anand Akhada) प्रमुख महंत सागरानंद सरस्वती (वय९०) (Mahant Sagaranand sarswati) यांचे आज सकाळी निधन झाले. ते षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते. (Shaddarshan Akhada Parishad) त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्राची हानी झाली. (Trimbakeshwar`s Mahant Sagaranand sarswati passed away due to old age)

Mahant Sagaranand Sarswati
Breaking : खासगी ट्रॅव्हलच्या बसला भीषण आग; ११ प्रवासी मृत्यूमुखी

महंत सागरानंद सरस्वती गेले काही दिवस आजारी होती. त्यांच्या तीन आठवडयांपासून येथील एका खासगी रुग्णालयात उपचार होते. वृद्धापकाळामुळे आज सकाळी त्यांचे निधन झाले. महंत सागरानंद यांच्या निधनामुळे त्यांचे अनुयायांनी दुःख व्यक्त केले. त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक आखाड्यांचे नेतृत्व करणाऱ्या षड्दर्शन आखाड्याचे ते अध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यांच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली. अत्यंत शांत स्वभावाचे सागरानंद संत समाजात विशेष लोकप्रिय होते.

Mahant Sagaranand Sarswati
ह्रदयद्रावक; एक तास होरपळत होती बस आणि प्रवासी!

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

महंत सागरानंद सरस्वती स्वामीजींचे नुकतेच महानिर्वाण झाल्याचे दुःखद वृत्त कळाले. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून पितृतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

शोक संदेशात भुजबळ म्हणतात की, सिंहस्थ कुंभमेळ्याची खडान खडा माहिती असलेले एक जाणकार संत परंपरेतील ज्येष्ठ श्रेष्ठ महात्मा जुन्या पिढीतील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून सागरानंद सरस्वती स्वामीजींची ओळख होती. अनेक दशके त्र्यंबकेश्वरात ते वास्तव्यास होते. माझ्या कार्यकाळातील दोन कुंभपर्व नियोजनात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले.

सागरानंद सरस्वती स्वामीजींनी धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिलं. अतिशय महान कार्य करणाऱ्या श्री स्वामीजींचे भारतभरात मोठा शिष्य परिवार आहे. त्यांच्या निधनाने त्यांचा संपूर्ण भक्त परिवार पोरका झाला असून पितृतुल्य व्यक्तिमत्व हरपले आहे.

मी व माझे कुटुंबीय स्वामीजींच्या भक्तपरीवाराच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पवित्र स्मृतिस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com