नाशिक : नाशिक ते औरंगाबाद मार्गावर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हॉटेल मिरचीजवळ एका खासगी बसचा मोठा अपघात (Bus Accident)झाला. अपघातानंतर या बसमध्ये आग लागल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ३८ प्रवासी जखमी झाले. (Ten travelers death in bus burn after accident in Nashik) मृतांमध्ये बसचा चालक आणि काही मुलांचाही समावेश आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची माहिती घेतली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाश्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींना तातडीने उपचार मिळावेत, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पुसदमधील चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातील सहा प्रवासी गंभीररित्या भाजलेले आहेत. प्राथमिक माहितीनुसार ही खासगी बस आणि एका आयशर टेम्पोमध्ये अपघात झाला. यानंतर ट्रॅव्हल्सच्या डिझेल टँकमध्ये आग लागली. अवघ्या बसने पेट घेतला.
बस पेटलेली असताना प्रवासी खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. बसमधील लोकांना बाहेर पडायला मार्ग नव्हता. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार ते पाच बंबांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यानच्या काळात अनेक प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे.
ही बस स्लीपर कोच होती. पहाटे अपघात झाला तेव्हा अनेक प्रवासी झोपेत होते. त्यांना त्यातून बाहेर पडणे देखील शक्य झाले नाही. पहाटेचे 5:15 वाजले असल्याने बहुतांश प्रवासी साखर झोपेत होते, त्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.