ह्रदयद्रावक; एक तास होरपळत होती बस आणि प्रवासी!

ह्यदयद्रावक; अपघातग्रस्त बसमध्ये सापडले भाजलेल्या अवस्थेत बाळ
Burnt bus in Nashik
Burnt bus in NashikSarkarnama

नाशिक: औरंगाबाद महामार्गावर झालेल्या तिहेरी अपघातातील बस एक तास आगीत होरपळत होती. त्यात प्रवासी अडकले होते,मात्र पहाटेची वेळे असल्याने त्यांना तात्काळ मदत मिळू शकली नाही, असे सुत्रांनी सांगितले. (BURNED INFANT FOUND IN ACCIDENT BUS AT NASHIK)

Burnt bus in Nashik
Breaking : खासगी ट्रॅव्हलच्या बसला भीषण आग; ११ प्रवासी मृत्यूमुखी

या अपघातातील बस क्रमांक एमएच २९ एडब्लू ३१०० ही चिंतामणी ट्रॅव्हलची बस होती.नुकतेच बसमध्ये पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये भाजलेल्या अवस्थेत एक बाळ सापडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला भेट देणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रूग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

Burnt bus in Nashik
Shivsena: शिंदे गटाच्या कारकर्त्यांना चोपणाऱ्या रणरागिणींचा शिवसेनेकडून सन्मान

नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत,अमित कुमार (वय ३४), सचिन जाधव (वय ३०), अश्विनी जाधव (वय २६), सेवादास वाघमारे (४३), राजु रघुनाथ जाधव (३३), निलेश प्रेमसिंग राठोड (३०), भगवान श्रीपतराव मनोहर (६५), संतोष राठोड (२८), हंसराज बागुल (४६), डॅा. गजकुमार बाबुलाल शहा (७९), त्रिशीला शहा (७५), भगवान लक्ष्मण भिसे (५५), रिस्मिना पठाण (४५), ज्ञानदेव राठोड (३८), अजय देवगण (२३), प्रभादेवी जाधव (५५), गणेश लांडगे (१९), पुजा गायकवाड (२७), आर्यन गायकवाड (८), इस्माईल शेख (४५), जयसुंबी पठाण (६०), पायल शिंदे (९), चेतन मधुकर, महादेव मारूती, मालु चव्हाण (२२), अनिल चव्हाण (२२), दिपक शेंडे (४०), साहेबराव जाधव (५०).

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने यासंदर्भात अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ०२५३-२५७६१०६ आणि ०२५३-२५७२०३८ दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com