Mumbai News : राज्यात विधानसभा निवडणुकीला उद्या 23 नोव्हेंबरला निकाल लागत असून, महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सरकार स्थापनेचा दावा केला जात आहे.
निवडणुकीत तिसरा पर्याय देणारा 'महाशक्ती'कडून प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी मोठा दावा केला. "आम्हाला दोन्ही राष्ट्रीय पक्ष पाडण्याचा प्रयत्न करत होते. पण आम्ही त्यांना झुंजवले. राज्यात महाशक्ती निकालात टॉप राहील", असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीचा उद्या निकाल आहे. तत्पूर्वी एक्झिट पोल समोर आले असून, यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये (Mahayuti) चुरस राहिली. परंतु या दोन्ही आघाड्यांना पर्याय तिसरा बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांनी महाशक्तीच्या स्वरुपात दिला होता. राज्याच्या निकालात 'महाशक्ती' टॉप राहील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, "आम्हाला दोन्ही राष्ट्रीय पक्ष पाडण्याचा प्रयत्न करत होते. पण आम्ही त्यांना झुंजवले. त्यांच्यामध्ये संभ्रम होता. महाराष्ट्रात 125 पैकी 25 जागांवर महाशक्ती टॉप राहील. राज्यात महाशक्तीच्या 10 जागा कोणत्याही परिस्थितमध्ये निवडून येतील". सरकार आमचंच येईल. अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार येईल, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.
विधानसभेच्या निकालाआधीच आमदार बच्चू कडू यांनीही सरकार स्थापनेबाबात मोठा दावा केल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या भुवया उंचवल्या आहेत. आमचं सरकार येईल. अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार बनेल आणि मोठ्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा आम्ही घेऊ. आमच्याशिवाय कोणाचेही सरकार येणार नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
'एक्झिट पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडी बहुमताजवळ, जात नाही. त्यामुळे आमच्याशिवाय सरकार होणार नाही', असाही दावा बच्चू कडू यांनी केला. निकलानंतर महाशक्तीची काय भूमिक राहील, याची आता उत्सुकता आहे. तिसरा पर्याय म्हणून राज्यात महाशक्ती निवडणुकीला समोरे गेली. शेतकऱ्यांच्या प्रश्वावर आक्रमकपणे निवडणूक लढली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.