

Nashik Politics : एकीकडे महापालिका निवडणुकीत आमदार-खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यातून आमच्या पक्षात घराणेशाही नाही हे दाखवण्याच्या प्रयत्न भाजप करत आहे. पण असे असतानाही नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षातून भाजपध्ये आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबात तीन तर मनसेतून आलेल्या दिनकर पाटील यांच्या कुटुंबात दोन जणांना तिकीट देण्यात आल्याने ज्यांना तिकीट नाकारल्यात आले असे निष्ठावंत तसेच ज्याचे तिकीट बाद झाले अशा उमेदवारांमध्ये असंतोष वाढल्याचे चित्र आहे. तसेच पाटील व बडगुजर यांच्यावर भाजपमधील कोण इतके मेहरबान झाले असा प्रश्नही राजकीय वर्तुळातून उपस्थिती केला जात आहे.
भाजपने नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात इनकमिंग मोहीम राबवली. विरोधी पक्षातील अनेकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. शंभर प्लसचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पक्षातील निष्ठावंतापेक्षा आयारामांवर अधिक विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंताच्या रागाचा सामना पक्षश्रेष्ठींना करावा लागला. त्यातून नाशिकमध्ये मोठ्या थरारक घडामोडी घडल्या. एबी फॉर्म वाटपाच्या दिवशी नाशिक-मुंबई महामार्गावरील विल्होळी येथील बंगल्यात इच्छुकांनी धुमाकूळ घातला. अगदी शहराध्यक्षांच्या गाडीचा पाटलाग केला गेला.
भाजपमधील निष्ठावंताना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी स्थानिक आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ उडाला. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी फार्म हाऊसचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिस संरक्षणात आमदार व अध्यक्षांना एबी फॉर्म वाटप करण्याची वेळ आली. पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप आमदारांवर करण्यात आला.
एबी फॉर्मवाटपाच्या दिवशी झालेल्या राड्यानंतर उमेदवारी अर्ज छानणीच्या दिवशी पुन्हा राडा झाला. भाजपने प्रभाग क्रंमाक २९ अ मध्ये माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि दीपक बडगुजर या दोघांना एबी फॉर्म दिले होते परंतु छानणीत मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला. तसेच तसेच प्रभाग २५ (क) मध्ये भाग्यश्री ढोमसे आणि हर्षा बडगुजर यांना तर प्रभाग २६ (क) मध्ये पुष्पावती पवार आणि अलका अहिरे यांना भाजपने एबी फॉर्म दिले. त्यात माजी नगरसेविका ढोमसे आणि पुष्पावती पवार यांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे बडगुजर कुटुंबातच तीन जणांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे सिडको भागात संघर्ष उफाळला.
तसेच इकडे प्रभाग ९ दिनकर पाटील यांनी भाजमध्ये प्रवेश केल्याने भाजपमधील अनेकांनी उमेदवारी मिळणार नाही या भावनेतून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या प्रभागात दिनकर पाटील यांच्यासह त्यांचा मुलागा अमोल पाटील यालाही भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे प्रत्यक्षात निष्ठावंतांना बाजूला सारून ऐन वेळी बाहेरून आलेल्यांना तिकीट वाटपात प्राधान्य दिल्याने भाजपतील असंतोषाला आता अधिक धार आल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.