BJP Politics : 'विरोधकांची तोंडं बंद करा; ते कसेही असले तरी...'; स्थानिकच्या निवडणुकीसाठी भाजपने दंड थोपटले, कार्यकर्त्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

Girish Mahajan on Local Body Elections : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आता भाजपचे प्रमुख नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे काहीही करून सत्ता मिळवायचीच असं भाजपने पक्क ठरवल्याचं स्पष्ट झालं आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News, 14 Sep : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आता भाजपचे प्रमुख नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे काहीही करून सत्ता मिळवायचीच असं भाजपने पक्क ठरवल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेत. त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु असल्याचं चित्र मागील अनेक महिन्यांपासून दिसत आहे.

अजूनही अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. अशातच आता या पक्ष प्रवेशावर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विरोधकांची तोंडं बंद करा आणि त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका, असा सल्ला महाजन यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

Girish Mahajan
Sadabhau Khot News: आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्री भुजबळांना फटकारलं; म्हणाले, 'समाजाची माथी कशासाठी भडकवता?'

जामनेरमधील पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत बोलताना त्यांनी हा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. यावेळी ते म्हणाले, 'विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करु नका. तो कसाही असूद्या पण कामाचा माणूस आहे. अनेकजण आपल्यावर टीका करणारे आज आपल्याकडे आलेत. जो या पक्षामध्ये काम करेल त्याला किंमत आहे.

Girish Mahajan
Delhi Police FIR Congress: PM मोदी अन् त्यांच्या आईवर व्हिडिओ बनवणं काँग्रेसला भोवलं; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

फक्त फोटोबाजी करणाऱ्याला किमंत नाही. कार्यकर्ता छोटा जरी असला तरी त्याला पक्षात घ्या त्याचे स्वागत करा.' असं महाजन यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. महाजन हे भाजपचे मोठे नेते असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यामुळे आता भाजपने आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी विरोधकांना पक्षात घेण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी भाजप येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय या निवडणुकांमध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला एकही जागा मिळता कामा नये, असंही कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com