Maharashtra Budget Session 2024 : नाशिकसाठी 'या' तरतुदींमुळे भुजबळ यांनी अर्थसंकल्पाचे केले तोंड भरून कौतुक!

Maharashtra Budget 2024 Announcement Chhagan Bhujbal Reaction : अजित पवार यांनी आज अंतरिम बजेट सादर केले. यावेळी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या...
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal Nashik News :

अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज सादर केलेल्या राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करून देणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकास साधून राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये प्राधान्याने शेती, शिक्षण, पर्यटन, रस्ते, रेल्वे मार्ग, पायाभूत सुविधांवर विशेष भर या ( Maharashtra Budget 2024 ) अर्थसंकल्पात देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.० योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. “मागेल त्याला सौर कृषि पंप” या नवीन योजनेतून 8 लाख 50 हजार नवीन सौरकृषी पंप देण्याची तरतूद करण्यात आली आहे, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
Dinkar Patil Vs Hemant Godse News : 'माझ्यासमोर उभा राहू नकोस बाजुला हो, नाही तर..' ; दिनकर पाटलांचा हेमंत गोडसेंना इशारा!

राज्याच्या अर्थसंकल्पांत नाशिकच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गडाच्या विकासासाठी 81 कोटी 86 लाख रुपयाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधांची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच नाशिकसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनास सुरुवात करण्यात आली आहे. नाशिक येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय उभारण्याबाबतही तरतूद करण्यात आल्याने नाशिकच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील वंचित घटकांचा विचार करून बारा बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी “संत गाडगेबाबा बारा बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ” व मातंग समाजासाठी “आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था'' आर्टीची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याने हा अर्थसंकल्प राज्यातील प्रत्येक घटकाला सामावून घेणारा अर्थसंकल्प असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal
Manikrao Kokate News: आमदार कोकाटे अन् राजाभाऊ वाजे गटाला इशारा, तिसरी शक्ती 'उदयास' येणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com