Manikrao Kokate News: आमदार कोकाटे अन् राजाभाऊ वाजे गटाला इशारा, तिसरी शक्ती 'उदयास' येणार?

Manikrao Kokate and Rajabhau Waje : बाजार समिती सभापतीच्या निवडणुकीतून कोकाटे आणि वाजे दोन्ही गटांना सावधानतेचा इशारा?
 Manikrao Kokate, Rajabhau Waje
Manikrao Kokate, Rajabhau Waje Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Uddhav Thackeray News: सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे गटाचे दोन संचालक फुटले. शिवसेनेच्या (ठाकरे गट) राजाभाऊ वाजे गटाचा सभापती झाले. आमदार कोकाटे यांनी हा आपला पराभव नव्हे तर गनिमी कावा असल्याचा दावा केला आहे.

सिन्नरच्या राजकारणात पक्ष दुय्यम आणि गट महत्वाचे मानले जातात. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार कोकाटे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे असे दोन गट सध्या येथे आहेत. गेल्या दोन वर्षात घडलेले राजकारण आणि राज्यातील पक्ष फुटीचे पडसाद सिन्नरच्या राजकारणात दिसून आले आहेत. त्यातूनच काल झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शशिकांत गाडे हे सकाळी राजाभाऊ वाजे यांच्या गटात आले आणि दुपारी सभापती झाले. राजकारणात हे धडसोड वृत्ती नवीन नाही. ती एक संस्कृती बनली आहे. मात्र यातून आपले संचालक सांभाळता न आलेल्या आमदार कोकाटे यांनी त्याला आपला 'गनिमी कावा' असे संबोधले आहे. याद्वारे स्वतःची व आपल्या समर्थकांची समजूत घालण्याचा केलेला प्रयत्न किती खरा? हे आगामी काळात दिसून येईल.

 Manikrao Kokate, Rajabhau Waje
Lok Sabha Election 2024 : 'हम भी है रेस में; मनसेनं प्रस्थापितांना ललकारलं !

आमदार कोकाटे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि सध्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाशी सख्य असलेले उदय सांगळे हा गट प्रभावीपणे काम करीत आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाची एक पद्धत आहे या पक्षात जो इतरांच्या पक्षातील लोक फोडून शिंदे गटात आणि त्यालाच 'भाव' मिळतो. सांगळे हे कंत्राटदार आहेत तो त्यांचा व्यवसाय असल्याने व्यावसायिक हितासाठी ते कधीही व कोणत्याही पक्षाशी सलगी करू शकतात त्यात त्यांना व इतरांनाही वावगे वाटण्याचे कारण नाही मात्र सांगळे सिन्नरमध्ये आपला प्रभाव आहे हे पालकमंत्री दादा भुसे आणि मुख्यमंत्री शिंदे (Eknath shinde )यांच्याकडे सिद्ध करण्यासाठी गेली काही दिवस धडपड करीत आहेत. हे लपून राहिलेले नाही सिन्नरच्या बाजार समितीत ऐनवेळी घडलेल्या राजकारणाचे श्रेय अप्रत्यक्षरीत्या सांगळे यांना देखील जाते.

वाजे गटाच्या आठ संचालकांमध्ये तीन संचालक सांगळे यांना मानणारे आहेत. सांगळे यांनी काही दिवसांपूर्वी या सर्वच आठ संचालकांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेशाचे मनसुबे आखल्याचे बोलले जाते. हे मनसुबे प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. मुंबईला गेल्यानंतर यातील बहुसंख्य संचालकांनी शिंदे गटात जाण्यास नकार दिला. उपसभापती असलेल्या सिंधुबाई कोकाटे या एकमेव संचालिकेने पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. सोमवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीवेळी या श्रीमती कोकाटे (Kokate) अचानक नॉट रिचेबल झाल्या. यातून बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी आमदार कोकाटे यांचे बंधू भरत कोकाटे यांनी शशिकांत गाडे आणि नवनाथ नेहे या आमदार कोकाटे गटाच्या दोन संचालकांना गळाला लावले होते. आधी त्यांचा शिवसेनेत (Shivsena) प्रवेश झाला. नंतर गाडे सभापती झाले.

 Manikrao Kokate, Rajabhau Waje
Loksabha Election 2024 : श्रीराम शेटे यांनी 'तुतारी' फुंकल्याने दिंडोरीत 'इंडिया' आघाडी झाली भक्कम!

आमदार कोकाटे यांचे दोन संचालक फुटले. याला कोकाटे गनिमी कावा म्हणतात. आपल्या गटाचा सभापती झाला, याला माजी आमदार राजाभाऊ वाजे आपला विजय म्हणतात. वस्तुत: काल झालेल्या निवडणुकीतून (Election) या दोन्ही गटांना एक अदृश्य इशारा मिळाला आहे. सिन्नरच्या राजकारणात उदय सांगळे भविष्यात तिसरी शक्ती म्हणून उदयास येण्यासाठी अतिशय जोमाने कामाला लागल्याची चिन्हे आहेत. ही धुसफूस यापूर्वीच सुरू झालेली आहे. मात्र त्यात नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांची हानी होऊ शकते. त्यामुळे ते उघड झालेले नाही. शिंदे गटाचा उदय झाल्यापासून सांगळे दादा भुसे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची मोठी 'भरभराट' लपून राहिलेली नाही. सध्याचे राजकारण तत्त्वापेक्षा 'अर्थपूर्ण' अधिक झाले आहे. यामध्ये कोकाटे यांच्या जवळच्या माणसांची नाराजी आणि वाजे गटाची जुळवा जुळव यात लाभ कुणाचा आणि हानी कोणाची हे लवकरच स्पष्ट होईल. दोन्ही गटांसाठी ही धोक्याची घंटा असू शकते.

Edited by : Rashmi Mane

 Manikrao Kokate, Rajabhau Waje
Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार कोण ? खासदार विखेंच्या विधानाने खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com