Nashik Loksabha : हेमंत गोडसे गारद! राजाभाऊ 'जायंट कीलर'

Nashik Lok Sabha Lead Rajabhau Waje : गोडसेंना प्रचारासाठी प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळला नसल्याने त्यांच्यावरही पराभवाची नामुष्की ओढवल्याची शक्यता आहे.
Rajabhau Waje-Hemant Godse
Rajabhau Waje-Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Lok sabha : महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघातील निकालाची चक्रे झपाट्याने फिरू लागली असून या निकालाच्या मतमोजणाीच्या फेऱ्यांमध्ये ठाकरे हे शिंदे-फडणवीसांना धक्के देत दिल्लीच्या दिशेने शानदार कूच करत आहेत. धारशिवमध्ये ठाकरेंच्या ओमराजेंनी दिग्गज पाटलांना धोबीपछाड दिल्यानंतर हेमंत गोडसेंना गारद करण्यात ठाकरेंच्या राजाभाऊंना नाशिकरांनी मोठे बळ दिले आहे. फेरी अखेर राजाभाऊ वाजेंना 94 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

गोडसेंना प्रचारासाठी प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळला नसल्याने त्यांच्यावरही पराभवाची नामुष्की ओढवली आहे. शिवसेनेतूनच (शिंदे गट)विशेषत: श्रीकांत शिंदेंनीच त्यांच्या उमेदवारीत खोडा घातला होता. या निमित्ताने श्रीकांत शिंदे यांच्या धोरणामुळे गोडसेंचा काटा काढला गेल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटावर मोठी आघाडी घेतली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक Election मतमोजणीत पाचव्या फेरी अखेर वाजे यांनी 51 हजार 700 मतांची आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत वाजे मोठी आघाडी घेत आहे. त्यामुळे नाशिकचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे.

Rajabhau Waje-Hemant Godse
Satara Loksabha Election 2024 Result: साताऱ्यात मोदींचा नव्हे पवारांचा करिष्मा; शशिकांत शिंदे आघाडीवर

वाजे यांना प्रत्येक मतमोजणीच्या फेरीत सरासरी दहा हजार पाचशे मतांची आघाडी मिळत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे चांगलेच पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या वाजे यांची गाडी सुसाट निघाली आहे. त्या तुलनेत गोडसे मात्र उभे राहतील अशी चिन्हे आहेत.

दिंडोरीत भगरे

दिंडोरी मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार देखील पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे यांना तिसऱ्या फेरी अखेर 70 हजार 600 तर डॉ. पवार यांना 65 हजार 879 मते मिळाली आहेत. भगरेंना येथे पाच हजारांची अल्प आघाडी आहे.

Rajabhau Waje-Hemant Godse
Parbhani Lok Sabha Election 2024 Result : परभणीत जानकरांची शिट्टी पिचली; ठाकरेंचा पठ्ठ्या दिल्लीच्या दिशेनं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com