Hindi Mandatory Controversy : "मराठी बोललंच पाहिजे पण..."; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून बावनकुळे राज ठाकरेंना करणार 'ही' मोठी विनंती

Raj Thackeray opposes Hindi language imposition : शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली असल्याने महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीला ठाम विरोध केला आहे. माकपने हिंदी भाषकांची मते खेचण्यासाठी भाजपचा हा खटाटोप असल्याचा आरोप केला आहे.
Chandrashekhar Bawankule, Raj Thackeray
Chandrashekhar Bawankule, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 19 Apr : शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली असल्याने महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीला ठाम विरोध केला आहे. माकपने हिंदी भाषकांची मते खेचण्यासाठी भाजपचा हा खटाटोप असल्याचा आरोप केला आहे.

त्यामुळे भाजपची कोंडी झाली असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर सावध भूमिका घेतली असल्याचे दिसून येते. ते म्हणाले, मराठी भाषा महाराष्ट्राची अस्मिता आहे. प्रत्येकाने मराठी बोललेच पाहिजे, सोबतच हिंदी भाषाही सर्वांना आली पाहिजे असे मत त्यांनी या वादावर मांडताना त्यांनी राज ठाकरे यांनाही आपण विनंती करणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हिंदी भाषेचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेतूनच राज्याचे सर्व कामकाज चालावे सरकार प्रयत्न करत आहे. काल अनावधानाने मी हिंदीला राष्ट्रभाषा म्हणालो.

हिंदी राष्ट्रभाषा नाही राजभाषा आहे . या देशात एखादे विकासाचे पाऊल उचलले तर त्याला थांबवण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. हिंदी विषय पाठ्यक्रमात घेतला असले तर त्याचे राजकारण करून आंदोलन करणे, लोकांना मारहाण करणे हे काही योग्य नाही. देशात कुठे गेला तर हिंदी बोलले जाते. हिंदी ही सर्वांना साधारणतः येते.

Chandrashekhar Bawankule, Raj Thackeray
Nana Patole : काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस येणार, पराभवाने खचलेल्या कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचा बूस्टर डोस

म्हणून देशातील ६० टक्के राज्यात हिंदीत बोलले जाते. त्यामुळे त्या राज्याची भाषेची अस्मिता कायम ठेवून हिंदी भाषा आपल्याला आली पाहिजे. त्यात काही गैर नाही असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. राज ठाकरे यांना माझी विनंती आहे की त्यांनी या विषयाला समजून घेतले पाहिजे. ते समजुतदार आहेत.

Chandrashekhar Bawankule, Raj Thackeray
Sanjay Raut : महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदीपासून नाहीच..., संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

एका भाषेचा समावेश झाला तर त्यात काय बिघडले? मराठीसुद्धा सोबत आहेच. राज ठाकरे यांनी पुढे यावे आणि हा विषय समजून घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. त्यांना मी भेटून विनंती करणार आहे. आपण सर्व मराठी भाषेला पुढे घेऊन जाऊ, परंतु या ठिकाणी नॅशनल पॉलिसी देखील लागू करावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com