Nana Patole : काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस येणार, पराभवाने खचलेल्या कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचा बूस्टर डोस

Congress Politics : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं आहे. राज्यातील पराभवाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेतृत्वात देखील बदल केले. त्यानुसार नाना पटोले यांच्याकडील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे देण्यात आली.
Nana Patole
Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Bhandara News, 19 Apr : विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदावर दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला निकालानंतर मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेला झालेल्या पराभवामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं आहे.

राज्यातील पराभवाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेतृत्वात देखील बदल केले. त्यानुसार नाना पटोले यांच्याकडील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे देण्यात आली. पक्षातील या बदलानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत नुकताच भंडारा येथे एक मेळावा पार पडला.

Nana Patole
Maharashtra Hindi controvercy : हिंदी भाषेच्या सक्तीचं समर्थन करत शिंदेंच्या नेत्याचा मनसेवर हल्लाबोल, म्हणाले, "मनसे नेत्यांची मुलं..."

या मेळाव्यात बोलताना पटोले यांनी काँग्रेस सत्तेत येईल, असं आश्वासन दिलं. मात्र, या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आपल्या मनातील खदखद पटोले यांच्याजव बोलून दाखवली. केवळ निवेदन देण्यासाठी आणि मोर्चे काढण्यासाठी आमचा वापर करू नका.

यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करा तसंच त्यांचा निवडणुकीपुरता वापर न करता पक्षाच्या बैठकांमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक द्या, अशी भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

Nana Patole
BJP Politics : भाजप पुणे शहराचा कारभारी बदलणार! शहराध्यक्षपदी ब्राह्मण, मराठा की ओबीसी चेहरा? कोल्हापूरकर घेणार निर्णय

कार्यकर्त्यांच्या तक्रारी आणि भावना जाणून घेतल्यानंतर नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांनी केवळ पद न घेता त्यांची जबाबदारीही योग्य पद्धतीने पार पाडावी, अशा सूचना दिल्या. शिवाय पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी गाव पातळीवरील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचा असं त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं.

तसंच यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पुढील पाच वर्ष मेहनत घ्या, पाच वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत येईल, असं आश्वासनही दिलं. त्यामुळे सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त करत पटोलेंनी कार्यकर्त्यांना बुस्टर डोस दिल्याचं पाहायला मिळत आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com