Maharashtra Politics : 2 जुलैची आठवण सांगितली, अजित पवारांच्या नाराज आमदाराने बोलून दाखवली मंत्रीपदाची इच्छा

Ajit Pawar’s MLA Anil Patil recalls July 2 and expresses disappointment over not getting a ministerial berth in Maharashtra politics : आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी पाटील यांनी मंत्री असताना मिळालेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था नाकारली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून आपल्याला सुरक्षा नको असल्याचे त्यांनी सांगितले होते.
 Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी चे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळालं नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांना मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री करण्यात आलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती.

अनिल पाटील यांची मंत्रिपदाची इच्छा खूप दिवसांनी पुन्हा एकदा बाहेर आली आहे. जळगाव येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला.या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर त्यांनी मंत्रीपदाबाबतची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात तीच चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीचे ज्यावेळेला दोन गट पडले त्यावेळी अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत राहीले. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं होतं. अनिल पाटील यांनी त्यावेळीचा किस्सा सांगितला. ते म्हणाले त्यादिवशी 2 जुलै 2023 ची तारीख होती. आणि काल देखील 2 जुलै ही तारीख होती. त्यामुळे मी तटकरे साहेबांसोबत होतो. त्यामुळे तटकरे साहेब आता बोलतील, तेंव्हा बोलतील अशी मी वाट पाहत होतो असं आमदार अनिल पाटील म्हणाले.

 Ajit Pawar
Kunal Patil : राहुल गांधी कुठे कमी पडले? कुणाल पाटील यांनी सांगितली सर्वात मोठी कमतरता

अनिल पाटील पुढे म्हणाले, त्यादिवशी रात्री 12 वाजता अजित दादांच्या बंगल्यावर पोहोचलो होतो. नाश्ता केला त्यानंतर तटकरे साहेब समोरुन आले..आपल्याला मंत्री मंडळात शपथविधीसाठी जायचे आहे असं ते मला म्हणाले. सर्वात आधी मला मंत्री पदाबद्दल सांगणारे सुनील तटकरे साहेब होते. त्यांनीच मला मंत्री पदाबद्दल कानात सांगितले. त्यानंतर आम्ही शपथविधीसाठी गेलो असं आमदार अनिल पाटील म्हणाले.

 Ajit Pawar
Kunal Patil Politics; कुणाल पाटील म्हणतात, वडील रोहिदास पाटील यांनीही भाजप प्रवेशाला विरोध केला नसता!

काल पुन्हा 2 जुलैची तारीख होती. मी कोट घालून गेलो, 12 वाजले, तटकरे साहेब आता बोलतील, मग बोलतील, केव्हा बोलतील अशी मी वाट पाहत होतो. आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, पण जाहीर करा असे मी बोलणार नाही असे यावेळी भाषणात आमदार अनिल पाटील म्हणाले.

दरम्यान, आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी पाटील यांनी मंत्री असताना मिळालेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था नाकारली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून आपल्याला सुरक्षा नको असल्याचे त्यांनी सांगितले होते. तेव्हा पासून ते नाराज असल्याचं स्पष्ट होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com