Girish Mahajan Politics : उद्या संजय राऊत भाजपमध्ये आले तरी आश्चर्य नाही, महाजनांनी हळूच सोडलं रॉकेट

Girish Mahajan statement : मंत्री गिरीश महाजन हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन लोटस राबवत आहे. नाशिकमध्ये त्यांनी काल मोठा धमाकाच केला.
Sanjay Raut Criticizes Girish Mahajan over Badlapur Rape Case
Sanjay Raut Criticizes Girish Mahajan over Badlapur Rape CaseSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये काल मोठा धमाका केला. भाजप आमदार व निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांचा विरोध झुगारुन त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व कॉंग्रेस पक्षातील काही दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर भाजप आमदारांना डावलून भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशांमुळे विरोधकांकडून महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली.

मात्र गिरीश महाजन यांनी राजकारणातील वास्तव मांडत टीकेला फारसे महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले. महाजन म्हणाले, आमच्यावर टीका करतात, ते उद्या आमच्याबरोबर देखील येऊ शकतात. उद्या संजय राऊत भाजपमध्ये आले, तरी त्यात आश्चर्य वाटायला नको, असे सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महाजन पुढे म्हणाले, राजकारणात विरोध आणि टीका ही कायमस्वरूपी नसते. आज भाजपमध्ये असलेले अनेक नेते पूर्वी भाजपविरोधात बोलत होते. मात्र, आज तेच नेते भाजपमध्ये आहेत आणि आमदार, मंत्री अशा पदांवर जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. यावरून पक्षवाढ हीच खरी राजकीय वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी पटवून सांगितले.

Sanjay Raut Criticizes Girish Mahajan over Badlapur Rape Case
Manikrao Kokate : मंत्रिपद गमावलेले कोकाटे आता स्टार प्रचारकांच्या यादीतूनही बाद ; दादांनी थोडं बाजूलाच ठेवलं..

भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. भाजपकडे विविध विचारधारांचे नेते येत आहेत. ही बाब पक्षाची ताकद दर्शवणारी आहे. पक्ष वाढतोय, हीच खरी गोष्ट आहे. त्यामुळे टीकांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही असा टोला त्यांनी टिकाकारांना लगावला.

राजकारणात काहीही होऊ शकते अशी सध्याची परिस्थिती आहे. अशात गिरीश महाजन यांनी राऊत यांच्या यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे भाजपच्या पुढील रणनितीकडे आता सर्व विरोधी पक्षांसह मित्रपक्षांचेही लक्ष लागून आहे.

दरम्यान, काल नाशिकमध्ये झालेल्या प्रवेशावरुन संजय राऊत यांनी मंत्री महाजन यांच्यावर सडकडून टीका केली. आमच्याकडून जे गेले किंवा मनसेमधून जे गेले ते भटकेचं आहेत अशी बोचरी टीका राऊत यांनी केली. गिरीश महाजन हे स्वतः ला बाहुबली समजतात, पण त्यांना देखील नगरपालिकेत फटका बसला आहे. त्यांची पत्नी निवडून आली मात्र इतर कारणामुळे त्यांना फटका बसल्याचे राऊत म्हणाले.

Sanjay Raut Criticizes Girish Mahajan over Badlapur Rape Case
Nashik BJP MLAs : नाशिकमधील भाजपचे तीन्ही आमदार बेदखल, गिरीश महाजनांचाच एककल्ली कारभार

भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे. गौतम अदानी सुद्धा भाजपचे सदस्य आहेत. इतरांचे आमदार खासदार नेते आपल्या पक्षात घेणं म्हणजे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com