Yeola Politics, : छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास येवल्याच्या रणांगणात पोटनिवडणूक, सगळी सूत्रे समीर भुजबळांकडे जाणार असल्याची चर्चा

Yeola bypoll discussions : मंत्री छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जागेवर राज्यसभेवर गेल्यास येवल्यात पोटनिवडणुक होईल व समीर भुजबळ ही निवडणूक लढवतील अशा चर्चांनी जोर धरला आहे.
Chhagan bhujbal sameer Bhujbal
Chhagan bhujbal sameer Bhujbal sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या असल्याने त्यांनी आपला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागेवर राज्यसभेवर कोण जाणार याच्या चर्चा सुरु आहे. त्यात जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे.

सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीची मुदत अजून दोन वर्ष शिल्लक आहे. त्याजागेवर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची वर्णी लागेल अशा चर्चांनी जोर धरला आहे. असे झाल्यास भुजबळांची जागा रिक्त होऊन तिथे पोटनिवडणुक होऊन पोटनिवडणुक लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास येवला मतदारसंघाची संपूर्ण सुत्रे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे जातील. भुजबळांच्या जागेवर येवल्याची पोटनिवडणुक तेच लढवतील असे बोलले जात आहे.

त्यामुळे आता येवल्याच्या रणांगणात पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मध्यंतरी छगन भुजबळ यांची तब्येत बरी नव्हती. त्यावेळी, समीर भुजबळ यांनी येवल्यात लक्ष्य घातलं. समीर भुजबळ हे गेल्या वर्षभरापासून येवल्यात तळ ठोकून आहेत. येवल्यात गेल्यावर्षभरापासून त्यांचे विविध उपक्रम सुरु आहेत. नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्वही समीर यांनीच केले होते. नगरपालिका निवडणुकीत समीर भुजबळांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं. ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असल्याचे त्यावेळी बोलले गेले होते.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेलाच छगन भुजबळ यांना भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक लढवण्यास सांगितले होते, असा दावा स्वत: भुजबळ यांनी केला होता. भुजबळांनीही त्यासाठी तयारी दर्शवली होती. परंतु त्यावेळी महाराष्ट्रात मराठा - ओबीसी संघर्ष टोकाला गेला होता, त्यामुळे राज्यस्तरावर निर्णय होत नव्हता. त्यामुळे अखेरीस छगन भुजबळ यांनीच अधिक विलंब झाल्याने आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानंतर मध्यंतरी पुन्हा भुजबळ हे राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र, त्यानंतर दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या चर्चा थांबल्या. मात्र आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, भुजबळांचे येवल्यातील विरोधकही सावध झाले असून समीर भुजबळांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा याची चाचपणी सुरु आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीतही या विषयावरुन चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. या बैठकीत माणिकराव शिंदे यांनी पोटनिवडणुकीचा मुद्दा उपस्थितीत केला होता.

मंत्रीपद सोडून जाणे बरोबर नाही

परंतु यासंदर्भात समीर भुजबळ यांनी सरकानामाशी बोलताना छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार नसल्याचे म्हटले आहे. सध्याच्या राज्यसभेच्या जागेचा दोन ते अडीच वर्षांचाच कालावधी शिल्लक आहे. अशात राज्यातील मंत्रीपद सोडून जाणे बरोबर होणार नसल्याचे समीर भुजबळ यांनी सांगतिले. यापूर्वीही अशा चर्चा झाल्या होत्या. यासंदर्भात भुजबळ साहेब स्वत: माध्यमांशी बोलून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही समीर भुजबळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com