Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात 15 शाळांचा संचालक असलेला भाजपचा मोठा मासा जाळ्यात; सोलापुरातून घेतले ताब्यात

Shalarth ID Scam Sanjay Garud Arrest: शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढत आहे. या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी भुसे यांना आठवड्याची मुदत दिली आहे. यावरून आता राजकारण तापले आहे.
BJP leader arrested in Shalarth ID scam
BJP leader arrested in Shalarth ID scamSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 28 Jul : शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे 15 हून अधिक अधिकारी अडचणीत आले आहेत. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये खुद्द शिक्षणमंत्री दादा भुसेही अडचणीत आले आहेत.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढत आहे. या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी भुसे यांना आठवड्याची मुदत दिली आहे. यावरून आता राजकारण तापले आहे.

महाराष्ट्रातील आणि राज्याच्या शिक्षण क्षेत्रात शालार्थ आयडी घोटाळ्याने खळबळ उडवून दिली. यामध्ये 160 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. याबाबत विरोधकांनी सरकार व थेट आरोप केला आहे. अशातच आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

BJP leader arrested in Shalarth ID scam
Nashik NMC : नाशिक मनपात ‘स्टार रेट’वरून वाद वाढला; कंत्राटदारांना वाढीव दर देण्यास शिवसेना महानगप्रमुख प्रवीण तिदमे यांचा कडाडून विरोध

या प्रकरणी सत्ताधारी भाजपच्या जळगाव येथील मोठे राजकीय प्रस्थ संजय गरुड याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्याला मुख्य सूत्रधार म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

भाजप नेता आणि शेंदुर्णी, जळगाव येथील संजय गरुड याच्या 15 शाळा आहेत. या सर्व शाळांचा तो संचालक असून त्यात बनावट नियुक्त्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय गरुड यांना सोलापूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

BJP leader arrested in Shalarth ID scam
Kolhapur Murder: कोल्हापुरमधील महिला सरपंचाची अनैतिक संबंधातून हत्या; पंढरपूरच्या बहाण्याने नेवून काढला काटा : 40 वर्षीय प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

संजय गरुड हा पोलिसांच्या रडारवर होता होता. तो सातत्याने आपली ठिकाणी बदलत होता. एसआयटी पथकाचे सहाय्यक आयुक्त संदीप मेटके आणि पोलीस निरीक्षक रामदास शेळके त्याच्या मागावर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com