Kolhapur Murder: कोल्हापुरमधील महिला सरपंचाची अनैतिक संबंधातून हत्या; पंढरपूरच्या बहाण्याने नेवून काढला काटा : 40 वर्षीय प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

Kolhapur Sarpanch Murder, Surekha Nyare Murder, Shahuwadi Crime: कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या सरपंच सुरेखा न्यारे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Akola Sheikh Mohsin Death | Shiv Sena Leader Death Probe
Kolhapur Sarpanch Murdersarkarnama
Published on
Updated on

Shahuwadi Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) यांचा अनैतिक संबंधातून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी मृत सुरेखा यांचा प्रियकर प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (४०) याला ताब्यात घेतले असून, या घटनेने गावासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रकाश व सुरेखा हे शिरगावमध्ये एकाच गल्लीत समोरासमोर राहत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये जवळीक होती. मागील अडीच वर्षे सुरेखा शिरगावच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या, तर "माझ्याशी लग्न कर" असे म्हणून सुरेखा वारंवार प्रकाशला धमकावत होती.

Akola Sheikh Mohsin Death | Shiv Sena Leader Death Probe
Crime News : बदलापुरात रक्तरंजित थरार! गोळीबारात तरुणाचा मृत्यू, क्रिकेट टर्फवर सापडला रक्ताच्या थारोळ्यात; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

याच गोष्टीचा राग मनात धरून प्रकाशने सुरेखा यांच्या खूनाचा कट रचला. सुरेखा यांना "आपण पंढरपूरला जाऊया" असे सांगून प्रकाशने त्यांना आपल्या चारचाकी (एमएच ०९ जी झेड ६८१५) गाडीतून गावाबाहेरील लिंडोरी नावाच्या शेतात आणले.

तिथे प्रकाशचा जनावरांचा एक गोठा होता, याच गोठ्यामध्ये रविवारी (ता. २६) सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रकाशने सुरेखा यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली भिवंडी पोलिसांना दिली आहे.

Akola Sheikh Mohsin Death | Shiv Sena Leader Death Probe
Crime News : NCP SP नेत्याचे संपर्क कार्यालयच अज्ञाताने पेटवून दिलं; कागदपत्रे जळून खाक, CCTV कॅमेऱ्यात घटना कैद

खून केल्यानंतर त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह मुंबई येथे दूरवर समुद्रात फेकून देण्याचा प्रकाशचा कट होता. त्यानुसार तो भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे पोहोचला आणि त्याने भाचा संदेशला फोन करून पुढील कट सांगितला, परंतु भाच्याने या संपूर्ण प्रकाराची पोलिसांना माहिती दिल्याने प्रकाश भिवंडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून नारपोली पोलिस ठाण्याकडून या प्रकाराची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात वर्ग झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com