Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं शिर्डी इथं पेन्शन राज्य महाधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जुन्या पेन्शनवर मोठं आश्वासन देत मोठी राजकीय खेळी खेळली.
'सरकार बदला, मी तुम्हाला जुनी पेन्शन देतो, जशीच्या तशी', असं मोठं आश्वासन दिलं. राज्यात जुन्या पेन्शनसाठी संघर्ष करणारा मोठा वर्ग आहे, उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या तोंडावर शिर्डीतील त्यांच्याच अधिवेशनात मोठं आश्वासन दिल्यानं महायुती सरकारची कोंडी झाली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं शिर्डी (Shirdi) इथं आज अधिवेशन झालं. महाविकास आघाडीचे नेते या संघटनेच्या अधिवेशनात सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या अधिवेशनात जुनी पेन्शन योजनेसंदर्भात मोठं विधान केलं. माझं सरकार असतं, तर इथं बसण्याची ही वेळ येऊच दिली नसतं, असं म्हणत, सरकार बदला मी तुम्हाला शब्द देतो की, तुमची जुनी पेन्शन योजना जशीच्या जशी लागू करतो, असं उद्धव ठाकरेंनी आश्वासन देताच, अधिवेशनात सहभागी झालेल्यांनी उत्स्फूर्तपणे 'एकच मिशन जुनी पेशन', अशी घोषणाबाजी केली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "अधिवेशनात सहभागी झालेल्या माझ्या लाडक्या भावांचा आणि बहिणींचा आक्रोश सरकारपर्यंत जात नाही. मी तर माजी मुख्यमंत्री, पक्ष चोरलेला, चिन्ह चोरलंय, माझ्याकडं आता काहीच नाही. तरी देखील तुम्ही मला बोलावलं. कारण माझ्याकडं इमान आणि विश्वास आहे, म्हणून बोलवलं". सत्तेची पर्वा नाही. मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. कुटुंबियांची चिंता आहे. सत्ता येते-जाते, गेलेली सत्ता परत येणार आहे. नक्की येणार, परत येणार आणि सत्ते खेचून आणणार. मी तुम्हाला न्याय देणार, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी ठासून सांगितलं.
उद्धव ठाकरेंना अधिवेशनात का बोलवलं, यावर दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा डायलाॅग आठवला. "मिंधे-बिंधे मला सर्व सांगताय, 'मेरे पास पार्टी, मेरे पास सत्ता, मेरे पास ओ है, सबकुछ है, तुम्हारे पास क्या है?' यावर मी सांगतो, 'मेरे पास इमान है, विश्वास है", असे सांगून माझ्याकडं काहीच नसतानाच, तुम्ही बोलवलं, आता तुम्हाला न्याय दिल्यावर गप्प बसणार नाही, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरेंनी अधिवेशनात व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.