महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ दहशतवाद्यांचे समर्थक!

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिर नूतनीकरण कार्यक्रम माजी मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झाला.
Ashish Shelar
Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : राज्याचे (Maharashtra) सध्याचे मंत्रिमंडळ आतंकवाद्यांचे समर्थन (Terrorist supporter) करणारे आहे. असे निष्ठुर, नाकर्ते राज्याचे मंत्रिमंडळ आजपर्यंत झालेले नाही. असा प्रहार माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

Ashish Shelar
गिरीश महाजनांची व्यूहरचना शिवसेनेची मुसंडी रोखू शकेल?

येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिर वास्तू नूतनीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री. शेलार म्हणाले, की अशा मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसत आहेत. बाँबस्फस्फोटात सहभागी असणाऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या जात आहेत. विशेष म्हणजे ज्याची जमीन घेतली आहे, तो आजीवन कारावासात आहे. असे असताना त्याच्याकडून जमीन खरेदी कशी झाली. तो बाहेर आला होता की जमीन घेणारे आत गेले होते. असे प्रश्‍न उद्‌भवत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Ashish Shelar
मुख्यमंत्री, शरद पवारांसह सर्व भक्कमपणे नवाब मलिकांच्या पाठिशी!

अशा मंत्र्याच्या समर्थनार्थ आंदोलन केले जाते. आंदोलन कोणासाठी करावे, हेदेखील त्यांना कळत नाही. दरम्यान, काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, की काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जितका अपमान केला, त्यावरून ते इंग्रजांचे भाऊ भासतात. कोटींची जमीन लाखांमध्ये खरेदी केली. उर्वरित रक्कम बाँबस्फोटासाठी वापरण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा या राजकीय परिस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अभिनव भारत मंदिर नूतनीकरणाचे काम हिंदुत्वाची ऊर्जा निर्माण करणारे असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, नूतनीकरण करण्यात येणाऱ्या अभिनव भारत मंदिरात तैलचित्र, सावरकरांचा इतिहास जागविणाऱ्या विविध क्षणांचा समावेश असलेली चित्रे, पुस्तके आदींचा समावेश आहे. नवीन पिढीस, तसेच तरुणांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्यांचे विचार अंगीकारण्यासाठी यांचा उपयोग होणार असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

यावेळी स्वानंद बेदरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, इतिहास उपस्थितांसमोर मांडला. आमदार राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, हरिभाऊ लोणारी, सतीश शुक्ल, प्रदीप पेशकर, नाना शिलेदार, सुनील खोडे, गणेश मोरे, नंदू कहार, प्रतीक शुक्ल, विक्रांत चांदवडकर, अजिंक्य साने आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com