Trible Reservation News : धनगर समाजाला कोणत्याही दृष्टीने विचार केला तरीही त्यांना आदिवासी जमातींचे आरक्षण देताच येत नाही. याबाबत धनगर समाजाने निर्माण केलेल्या राजकीय दबावाला आदिवासी आमदारांनीदेखील एकत्र येत उत्तर दिले आहे. (All Trible MLA`s Of Maharashtra organize under Narhari Zirwal)
राज्यातील (Maharashtra) १८ आदिवासी (Trible) आमदार उद्या (ता.४) राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. यातील बहुतांशी आमदार आज दिल्लीत दाखल झाले. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना निवेदन देईल.
राज्यातील सर्वपक्षीय बावीस आमदार राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. वैयक्तिक कारणामुळे दोन आमदारांनी दिल्लीला जाता येणार नसल्याचे कळविले आहे. मात्र, त्यांचा पाठिंबा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उद्या (ता.४) सकाळी अकराला भेट होणार आहे.
आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत ही भेट असून, प्रामुख्याने धनगर समाजाला आदिवासी घटकांत आरक्षण देऊ नये ही मागणी आहे. राज्यात धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे आरक्षणाची मागणीने जोर धरला असताना या भेटीला महत्त्व आहे.
मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाडवी यांच्यासह इतर आमदारांचे शिष्टमंडळ झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली भेट घेणार आहे.
या प्रश्नावर आदिवासी समाजाच्या भावना तीव्र आहेत. राज्य व केंद्र शासनाने त्याबाबत तातडीने दखल घेऊन कारवाई करावी. यामध्ये राज्य शासनाने सुरू केलेले छुपे खासगीकरण, आदिवासी शाळा, शासकीय आश्रमशाळांचे खासगीकरण, सध्या राज्यातील जे बोगस आदिवासी आहेत, त्यांच्यावर कारवाई करणे, धनगर समाजाला आदिवासी जमातीतील आरक्षणास प्रखर विरोध आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.