Gulabrao Patil News : मुख्यमंत्र्यांवरील टीकेला गुलाबराव पाटलांकडून राऊतांना 'जशास तसे उत्तर'; म्हणाले, राऊतांच्या वडिलांनी शिवसेना...

Shivsena News : गुलाबराव पाटलांचा राऊतांवर पलटवार...
Shivsena News
Shivsena News Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी यंदा ठाकरे गटाने साधव भूमिका घेत महिन्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. या वेळीही आम्हालाच मैदान मिळेल, असा विश्वास ठाकरे गटाला आहे. शिवाजी पार्कवरून ठाकरे गट-शिंदे गटात गेल्या वर्षी कलगीतुरा रंगला होता. त्यांचा दुसरा भाग पुन्हा सुरू होणार का? असे चित्र सध्या आहे. शिवसेना कुणी स्थापन केली, यावरून दोन्ही गटांत दसरा मेळाव्यापूर्वीच शाब्दिक बाण मारणे सुरू झाले आहे.

राऊतांवर पलटवार

"प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे," असे सांगत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. "शिंदेंच्या वडिलांची शिवसेना स्थापन केली का, असा सवाल राऊतांनी केला आहे. त्यावर शिंदे गटाचे नेते, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

Shivsena News
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांनी निर्णय बदलला का? शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून लढणार...

न्यायालय ठरवेल

"बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती. मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी शिवसेना केली होती का? गेल्या वर्षी शिवाजी पार्क येथे आमचा दसरा मेळावा झाला होता..तो यंदाही होणार आहे," असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. गुलाबराव पाटलांनी राऊतांना 'जशास तसे उत्तर' देत "शिवसेना राऊतांच्या वडिलांनी स्थापन केली का? असा प्रश्न विचारला आहे. "शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होईल, हा न्यायालयीन प्रश्न आहे. न्यायालय ठरवेल त्याचाच मेळावा होईल," असे गुलाबरावांनी स्पष्ट केले.

तिघांना गणपतीचा आशीर्वाद...

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. ते मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी गेले नाहीत. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत का? अशी चर्चा रंगली आहे. याबाबत गुलाबराव पाटलांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "हा वादाचा विषय होऊ शकत नाही. फडणवीस यांच्या घरी गेले तरी गणपतीचा आशीर्वाद अन् एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले तरी गणपतीचा आशीर्वाद. तिघांना मिळून गणपतीचा आशीर्वाद असल्यामुळे सरकार चालत आहे. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी त्याला अर्थ नाही,"

Edited By : Mangesh Mahale

Shivsena News
Dheeraj Lingade News : काय सांगता? काँग्रेस आमदार पोलिस ठाण्यासमोर थाटणार मटक्याचं दुकान? नेमकं काय झालं ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com