पारोळा : ‘राज्यात (Maharashtra) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून सर्वत्र विकासकामे होत आहेत. इतर गोष्टींकडे लक्ष न देता, जनतेचे प्रश्न सोडवण्यावर महाविकास आघाडीने लक्ष दिले आहे. त्यामुळेच संपूर्ण राज्यात महाविकास आघाडी सरकारने रेकार्ड ब्रेक कामे करुन अजूनही सुरूच ठेवली आहेत’, असे प्रतिपादन शिवसेनेचे (Shivsena) आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी केले. (State Government is concentrating on people`s Devolopment)
शेवगे बुद्रूक (ता. पारोळा) येथे जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी १८ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले.
पारोळा बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहिदास पाटील, बाजार समितीचे संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे शाखा अभियंता धीरज पाटील, शेतकी संघाचे माजी चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील, व्हाइस चेअरमन सखाराम चौधरी, संचालक राजेंद्र पाटील, महाळपूरचे सरपंच सुधाकर पाटील, धुळपिंप्रीचे सरपंच संजय पाटील, बहादरपूरचे माजी सरपंच गोकूळ चौधरी, माजी सरपंच सदाशिव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार चिमणराव पाटील व आमदार अनिल पाटील यांनी शेगाव बुद्रूक गावातील विकासकामांसाठी निधीची घोषणा केली.
आमदार चिमणराव पाटील यांनी येणाऱ्या काळातही मतदारसंघांमध्ये ‘रेकॉर्डब्रेक’ विकासकामे होतील असे सांगितले. आमदार अनिल पाटील यांनी मतदारसंघातील विकासकामांचा लेखाजोखा मांडून शेवगे बुद्रूक गावाने संस्कृती जोपासली असून गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.