Farm Loan Waiver : 'शिंदे मुख्यमंत्री असते, तर सरसकट कर्जमाफी मिळाली असती' शिवसेनेच्या नेत्याने फडणवीसांना डिवचले; सरकारला घरचा आहेर

Shivsena Leader Targets Mahayuti government : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
Farm Loan Waiver; Devendra Fadnavis and Eknath Shinde
Farm Loan Waiver; Devendra Fadnavis and Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : महायुती सरकारमधील अंतर्गत संघर्ष नुकताच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून राज्याच्या पटलावर आला होता. कोकण आणि नाशिक येथे मतभेद उघड झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात महायुती सरकारविरोधातच मित्र पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले आहे. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते, तर शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळाली असती, असा दावा करत फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान आता शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे यांनीच साधलेल्या या निशाण्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काहीच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. तर याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली होती. याच नियमावलीवरून आता वादाची ठिणगी पडली असून शिंदेंच्या शिवसेनेनं आंदोलन केले. राहुरी बाजार समितीसमोर आणि अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन केले. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ज्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली.

यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी कर्जमाफीच्या नियमावलीवरून आपल्याच फडणवीस सरकारला धारेवर धरत जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, शासनाची कर्ज माफीची घोषणा आता फक्त कागदावरच उरली उरली असून वेगवेगळ्या जाचक अटी आणि कडक नियमांमुळे अनेक शेतकरी या योजनेतून बाहेर जातील. सरकारचे हे धोरण शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक करणारे असल्याचा आरोप त्यांनी केला.

Farm Loan Waiver; Devendra Fadnavis and Eknath Shinde
Farmer Loan Waiver : याआधी कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

तसेच फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधताना; नियमावली, जाचक अटी आणि कडक नियमांमुळे शेतकऱ्यांचा खोळंबा होणार आहे. मात्र आज एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असते, तर शेतकऱ्यांना या अडचणींचा सामना करावा लागला नसता. त्यांनी तात्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर केली असती. शेतकऱ्यांना संकटात टाकणाऱ्या अशा जाचक अटी आणि नियम कधीच लागू केले नसते.

Farm Loan Waiver; Devendra Fadnavis and Eknath Shinde
Farm Loan Waiver : शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी, 'तो' एक शब्द नाही; काँग्रेस नेत्याने सगळं उलगडून सांगितलं

दरम्यान आता या आदोलनातून थेट आपल्याच सरकारला शिवसेनेनं इशारा दिला असून मुदतही दिली आहे. सरकारने लादलेल्या या जाचक अटी 15 जून 2026 पर्यंत रद्द कराव्यात अन्यथा 'वर्षा' बंगल्याबाहेर आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com