Malegaon blast News, 06 Aug : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपींना 'एनआयए' कोर्टाने निर्दोष सोडले होते. या निकालावर मालेगाव शहरवासीयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यातूनच आता नव्याने राजकारण तापलं आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. बॉम्बस्फोटात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची समाजाची जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी आता स्थानिक माजी आमदार आसिफ शेख यांच्या पाठोपाठ 'एमआयएम'चे माजी आमदार इम्तियाज जलील यांनीही उडी घेतली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपींचा घटनेशी संबंध जोडण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेला यश आले नाही, असा निष्कर्ष विशेष 'एनआयए' न्यायालयाने दिला होता. स्फोटासाठी वापरण्यात आलेले बॉम्ब आणि अन्य गुन्हेगारी कट याबाबत संबंधित आरोपींचा संबंध जोडण्यात न्यायवैद्यक प्रणालीत पुरेसे पुरावे सिद्ध होऊ शकले नाहीत. या निष्कर्षामुळे सर्व आरोपी निर्दोष ठरले.
या खटल्यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित हे आरोपी होते. त्यांचा संबंध थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जोडण्याचा प्रयत्न झाला होता. यातूनच भगवा आतंकवाद हा राजकीय शब्द पुढे आला.
बॉम्बस्फोट खटल्यानंतर यावर पुन्हा एकदा जोरदार राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकालाचे स्वागत करताना काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. मालेगाव बॉम्बस्फोट खटलेला आता नवे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत आहे.
'एमआयएम'चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आता या प्रकरणात उडी घेतली. त्यांनी मालेगावच्या बॉम्बस्फोटातील पीडितांच्या गाठीभेटी घेतल्या. विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्यांची चर्चा केली. त्यानंतर या प्रकरणात मालेगावकरांमध्ये अन्यायाची भावना असल्याचे सांगितले.
एक दिवस आधीच माजी आमदार आसिफ शेख यांनी न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केले होते. या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष केला होता. त्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले होते.
आता माझी खासदार इम्तियाज जलील यांनीही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले आहे. मालेगाव शहरात 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा नागरिक ठार झाले होते. शंभरहून अधिक जखमी या आणि त्यांना न्यायाची अपेक्षा आहे. न्यायालयाच्या निकालाने ते पूर्ण झालेली नाही.
सबंध शहरात नागरिकांमध्ये अन्यायाची भावना आहे. ती दूर करण्याची जबाबदारी एमआयएम करील असा दावा जलील यांनी केला. यानिमित्ताने पुन्हा एकदा मालेगाव बॉम्बस्फोट निकालावरून नवे राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे मालेगावच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव आणि काँग्रेस पक्षाने या निकालावर आक्रमक भूमिका घेण्याचे टाळले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.