Malegaon - Dhule Loksabha : धुळ्यात भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस परतणार?

BJP Vs Congress -: उमेदवारीसंदर्भात शरद पवारांची भूमिका काँग्रेससाठी ठरणार महत्त्वपूर्ण
BJP & Congress Flags
BJP & Congress FlagsSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi News : मालेगाव - धुळे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले असून, काँग्रेसची सारी भिस्त आमदार कुणाल पाटील यांच्यावर आहे. शरद पवार यांनी उमेदवार न देता काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महायुतीला चांगली लढत देऊ शकते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसतर्फे 18 जानेवारीपासून विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्राची बैठक 27 जानेवारीला धुळे येथे होणार आहे.

महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत जागावाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचा काँग्रेसनेत्यांचा दावा आहे. त्यानुसार धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आपला हक्क कायम ठेवणार असल्याचे दिसते, तर दुसरीकडे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनीसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस प्रबळ असल्याचा दावा वेळोवेळी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP & Congress Flags
Nashik Political : उद्योगमंत्र्यांना नाशिकचा विसर अन् पालकमंत्र्यांची सारवासारव...

धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यात नाशिक जिल्ह्यातील तीन, तर धुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघावर मागील दोनवेळा भाजपाने (BJP) बाजी मारली आहे. कधी काळी रोहिदास पाटील यांच्या रूपाने काँग्रेसचा गड ठरलेल्या धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची पुरती दैना झाली.

रोहिदास पाटील यांचे पुत्र आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे एकहाती काँग्रेस (Congress) पक्षाला टिकवून आहे. गत लोकसभा निवडणुकीवेळी मोदीलाटेत कुणाल पाटील यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी मात्र ऐननिवडणुकीवेळी होणारे राहुल गांधींचे आगमन, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांमधील नाराजी, तसेच मुस्लिम मतांचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

BJP & Congress Flags
Dada Bhuse: नार्वेकरांवर शंका घेणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान ; भुसेंचा ठाकरेंवर पलटवार...

दरम्यान, या मतदारसंघात दादा भुसे यांचाही रस लपून राहिलेला नाही. या मतदारसंघात 55 टक्के ग्रामीण, 45 टक्के शहरी आणि धुळे व मालेगाव या दोन महापालिकांचा समावेश असलेला भाग आहे. मालेगाव बाह्य- बंदरे विकासमंत्री दादा भुसे (एकनाथ शिंदे गट), मालेगाव शहर- मौलाना मुफ्ती (एमआयएम), बागलाण दिलीप बोरसे (भाजप), धुळे शहर- फारूक शाह (एमआयएम), धुळे ग्रामीण- कुणाल पाटील (काँग्रेस) आणि शिंदखेडा- माजी मंत्री जयकुमार रावल (भाजप) असे धुळे-मालेगाव लोकसभेचे विधानसभानिहाय गणित आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com