MIM Akbaruddin Owaisi: ओवेसी यांनी दोनदा आमदार देणाऱ्या मालेगावचा विश्वासघात केला; विरोधकांचा घणाघात!

Malegaon Politics; All hospital, school, college projects for Malegaon city wrapped up, serious allegations by leaders-अकबरुद्दीन ओवेसी यांनी मालेगाव शहरासाठी रुग्णालय उभारण्याची केलेली घोषणा हवेतच विरली
Sabir Gohar & Akbaroddin owaisi
Sabir Gohar & Akbaroddin owaisiSarkarnama
Published on
Updated on

Malegaon News: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात राजकीय वातावरण तापले आहे. या संदर्भात सर्व नेते रोज परस्परांवर नवे आरोप करीत आहेत. ‘एमआयएम’ पक्षावर मालेगावच्या नेत्यांनी विश्वासघाताचा गंभीर आरोप केला आहे.

यासंदर्भात माजी आमदार आसिफ शेख आणि त्यांचे सहकारी साबीर गोहर यांनी ‘एमआयएम’ पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. शहराचे आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यावरही आरोप केले आहे. आमदार इस्माईल हे मालेगाव शहराच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प का बसतात असा प्रश्न त्यांनी केला.

या संदर्भात साबीर गोहर यांनी ‘एमआयएम’ चे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी २०१४ मध्ये मालेगाव शहरासाठी रुग्णालय, शाळा, महाविद्यालय उभारणार अशी घोषणा केली होती. त्या आधारे त्यांनी शहरातील नागरिकांच्या भावनांची खेळत मतदान करण्याचे आवाहन केले होते. दोन वेळा मालेगावकरांनी या पक्षाला आमदार दिला. मात्र ‘एमआयएम’ने मालेगावकरांशी विश्वासघात केला

Sabir Gohar & Akbaroddin owaisi
BJP leader Uddhav Nimse: भाजपला धक्का, खून प्रकरणात माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा जामीन फेटाळला.

‘एमआयएम’चे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी शहरातील भूमापन क्रमांक ९१ ही जमीन खरेदी केली होती. त्यासाठी सालार मिल्लत एज्युकेशन ट्रस्टच्या नावे जमीन खरेदी केली. हैदराबादच्या निवडणुकीत प्रचार करताना देखील ‘एमआयएम’ने मालेगाव येथील प्रकल्पांचा प्रचारात उपयोग केला होता.

सध्या मात्र संबंधित जमीन विक्रीचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी वर्तमानपत्रात टायटल व्हेरिफिकेशनची नोटीस प्रकाशित करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षात या जमिनीचा भाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अकबरुद्दीन ओवेसी ही जमीन विक्री करून नफा कमवू इच्छितात, असा दावा गोहर यांनी केला.

गेल्या दोन निवडणुका जिंकून ‘एमआयएम’ने मालेगावच्या मतदारांच्या भावनांची खेळण्याचे काम केले आहे. याबाबत स्थानिक नेते तसेच आमदार मुफ्ती इस्माईल हे देखील तोंड उघडायला तयार नाही. मालेगाव शहरावर आणि येथील नागरिकांवर बांगलादेशी तसेच रोहिंग्या मुसलमान असल्याचे आरोप होतात. शहराला बदनाम करण्याचे कारस्थान सत्ताधारी भाजप करतो. यावर देखील आमदार इस्माईल हे शांत बसतात. त्यांनी शहरातील जनतेशी प्रातारणि केली आहे, असे गोहर यांनी सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात ‘एमआयएम’ आणि अन्य पक्ष असे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते राजकीय आरोप करण्याचे कोणतीही संधी सोडत नाही. सध्या माजी आमदार आसिफ शेख यांसह अन्य सर्व विरोधी पक्षांना एमआयएम विरुद्ध मोठा राजकीय मुद्दा हाती लागला आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com