Sujay Vikhe Targets : पदाचा माज करू नका, आम्ही आहोतच..; डॉ. सुजय विखेंचा थेट इशारा, राजकारणात नवा संघर्ष पेटणार?

Sujay Vikhe Patil sharp remarks Loni event spark fresh buzz over growing BJP internal conflict with MLA Vivek Kolhe in Ahilyanagar politics : राहाता इथल्या लोणीतील भाषणात नाव न घेता सुजय विखे पाटलांची फटकेबाजी; ‘नवीन पोरं सत्ता घेऊन फिरतायत, मर्यादा पाळा’, असे म्हटलं आहे.
Sujay Vikhe Targets
Sujay Vikhe TargetsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar politics : गेल्या काही दिवसांपासून राजकीयदृष्ट्या शांत दिसणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत दिसू लागले आहेत.

लोणी येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भाजपचे युवा नेते आणि आमदार विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर विवेक कोल्हे यांनी कोपरगाव आणि शिर्डी (Shirdi) परिसरात आपली राजकीय सक्रियता वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांकडे थेट राजकीय इशारा म्हणून पाहिले जात आहे. आगामी काळात दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. त्यामुळे विखे पाटील (Sujay Vikhe) आणि कोल्हे गटातील राजकीय संघर्षाच्या ठिणग्या आणखी उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Sujay Vikhe Targets
Vivek Kolhe Vs Radhakrishna Vikhe Patil: ‘घायल होता हूं, तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखेंना थेट इशारा? अमित शाह-फडणवीस ‘हॉटलाइन’चाही दावा

कार्यक्रमात बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले, "कारखान्याचं चेअरमन झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, पद मिळालं पाहिजे अशी काही लोकांची धडपड असते. पण आम्हाला आमदार व्हायचं असतं तर दोन महिन्यांपूर्वीच झालो असतो. आता काही नवीन पोरं सत्ता घेऊन फिरत आहेत. त्यांना सांगू इच्छितो, पदाचा आनंद मर्यादित ठेवला पाहिजे."

Sujay Vikhe Targets
Sujay Vikhe On Bhausaheb Wakchaure : भाऊसाहेब वाकचौरे ‘यूबीटी’त राहणार की 'NDA'त जाणार? सुजय विखेंकडून ‘स्वागता’चे संकेत

यावेळी त्यांनी पुढे आणखी टोला लगावत म्हटलं, "आज तुम्ही ज्या पदाचा आनंद घेत आहात, ती पदं आम्ही सोडून दिलेली आहेत. आम्हाला लोकांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नाही. आम्ही गावात नुसते फिरलो तरी लोक हारगुच्छ घेऊन येतात. विखे पाटील परिवारावर लोक गेली 50 वर्षे प्रेम करत आहेत."

यावरच न थांबता त्यांनी पुढे स्पष्ट शब्दांत इशारा दिला. "जास्त भारावून जाऊ नका. पद यायला आणि जायला वेळ लागत नाही. मी स्वतः त्याचं जिवंत उदाहरण आहे. पदाचा मान-सन्मान राखला पाहिजे. त्याचा माज किंवा मगरुरी येता कामा नये. पदाचा उपयोग समाजकल्याणासाठी झाला तर आनंद आहे, पण दुरुपयोग झाला तर आम्ही आहोतच" असे म्हणत त्यांनी हातवारे करत सूचक इशारा दिला.

राजकीय विरोधकांवरही निशाणा साधताना सुजय विखे म्हणाले, "मागच्या सहा महिन्यांत आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे फार चर्चा करण्याची गरज नाही. मेंदूचा डॉक्टर फार काळ बाहेर राहिलाय, त्यामुळे मनोरुग्ण बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. आता मेंदूचा डॉक्टर परत येणार आहे आणि सगळ्यांवर उपचार करणार आहे."

सुजय विखे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण तापणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भाजपमधील विखे पाटील विरुद्ध कोल्हे हा संघर्ष आता उघडपणे समोर येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com