Praniti Shinde Solapur Politics : प्रणिती शिंदे थोपवणार का मोदी लाट? काय असेल सोलापूरसाठी काँग्रेसची रणनीती ?

Congress-BJP Politics : कधीकाळी सोलापूर जिल्हा राज्याच्या राजकारणातील केंद्रस्थान मानले जात होते.
Solapur | Praniti Shinde
Solapur | Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : कधीकाळी सोलापूर जिल्हा राज्याच्या राजकारणातील केंद्रस्थान मानले जात होते. लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार तर राज्याच्या राजकारणात हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काळाच्या ओघात देशातीलच राजकीय समीकरणे बदलली असून सोलापूर जिल्हा देखील याला अपवाद राहिलेला नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा 'इम्पॅक्ट' या मतदार संघावर झालेला आहे. शिवाय हा परिणाम केवळ लोकसभेपुरताच नाही तर विधानसभा निवडणुकीमध्येही जाणवला. मात्र, मतदारसंघातील गतवैभव मिळवण्यासाठी आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनीती ही महत्वाची ठरणार आहे.

केवळ काँग्रेस पक्षामुळेच नव्हे तर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाचेही तेवढेच महत्व या मतदार संघात आहे.गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या मतदार संघात पराभव स्वीकारावा लागला असला तरी शिंदे कुटुंबियांचा 'होल्ड' आणि सत्ताधाऱ्यांवरील नाराजी या दोन गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. शिवाय वय लक्षात घेता आगामी निवडणूक लढविणार नसल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केल्याने आता प्रणिती शिंदेंचे नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे. सत्ताधाऱ्यांवरील नाराजी, गेल्या ९ वर्षांमध्ये रखडलेली विकासकामे या मुद्द्यांना घेऊन प्रणिती शिंदे या संधीचे सोने कसे करतील, याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

Solapur | Praniti Shinde
Hemant Patil News : डीन वाकोडेंना शौचालय साफ करण्यास सांगणे खासदार हेमंत पाटलांच्या अंगलट; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

वाढते औद्योगिकरण, साखर कारखाने आणि त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघाचे राजकीय वजन यामुळे केवळ राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याला एक वेगळे महत्व आहे. लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. २०१४ च्या निवडणुकांपर्यंत हा मतदारसंघ खुला होता. खुल्या प्रवर्गासाठी मतदारसंघ असताना देखील अधिकतर काळ येथील नेतृत्व हे सुशीलकुमार शिंदे यांनी केलेले होते. त्यांचा एकहाती मतदारसंघावर होल्ड असल्यानेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंत मजल मारली होती.

मात्र, काळाच्या ओघात राजकीय समीकरणे ही बदलत गेली. बदलत्या समीकरणाचा परिणाम काय असतो हे सोलापूरकरांनाही अनुभवले आहे. २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरील उमेदवार पाहिला जात नव्हता तर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्वाकडे पाहून मतदारांनी आपला कौल दिला. त्यामुळे २०१४ निवडणुकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना देखील पराभव स्वीकारावा लागला होता. एवढेच नाही तर त्यांचा पराभव करणारे अॅड. शरद बनसोडे हे त्यांचेच राजकीय शिष्य मानले जात होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यापुरतेच मर्यादित असलेले बनसोडे हे देशभर प्रसिद्ध झाले होते.

पण पाच वर्षात विकास कामाबाबतची त्यांची उदासिनता, जनसंपर्काचा आभाव यामुळे २०१९ च्या निवडणुकीमध्ये परिवर्तन निश्चित मानले जात होते. राजकीय विश्लेषकच नव्हे तर सर्वसामान्य मतदारांचे देखील हेच म्हणणे होते. त्यानुसार सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचाराची तर आखणी केलीच पण मतदारसंघातील बारिक-सारिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले. तर दुसरीकडे शरद बनसोडे यांच्या बाबतील असलेली नाराजी ही पक्षश्रेष्ठींच्याही लक्षात आली होती. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीमध्ये कुणाला संधी मिळणार? याकडे लक्ष लागले होते.

मतदार संघातील जातीय समीकरणे लक्षात घेता पक्षाने जयशिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना उमेदवारी देण्यात आली. राजकीय पार्श्वभूमी नसतानाही केवळ मतदार संघातील समीकरणे जुळवण्यासाठी भाजपने ही खेळी रचली होती. शिवाय २०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा हा कायम होता. एवढेच नाहीतर वंचितनेही अनेक ठिकाणी आपल्या पक्षाचे उमेदवार दिले होते. सोलापूरसाठी तर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच निवडणूक लढवली होती. त्यामुळे जातीय समीकरणे लक्षात घेता याचा सर्वाधिक फटका हा सुशीलकुमार शिंदे यांनाच बसला होता.

Solapur | Praniti Shinde
ED Action On Sanjay Singh : सकाळ सकाळी आप खासदार संजय सिंहांच्या घरी ईडी दाखल; मद्य घोटाळाप्रकरणी छापेमारी!

दीड लाखहून अधिक मतांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. मात्र, गेल्या ५ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. विकासाबाबत दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षात झालेली कामे यामध्ये मोठी तफावत आहे. शिवाय सोलापूरसारख्या या मतदारसंघात अधोरेखित होईल एकही काम झालेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये केवळ आश्वासनावर मतदार हे समाधानी राहतीलच असे चित्र नाही. भाजपाची ही दुखरी बाजू असली तरी काँग्रेस मात्र वेगळाच रणनीतीमध्ये आहे. कार्यकर्त्यांची मागणी आणि सुशीलकुमार यांनी निवडणुकीला घेऊन केलेले विधान यामुळे आता लोकसभेसाठी प्रणिती शिंदेंचे नाव समोर येत आहे.

गेल्या तीन टर्मपासून त्या सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. शिवाय त्या मतदार संघापुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत तर राज्यस्तरावरील अनेक मुद्दे घेऊन त्यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असल्या तरी त्यांची कार्यशैली ही वेगळी आहे. जनसंपर्क आणि कामातील आक्रमकपणा यामुळे तरुणामध्ये त्यांची 'क्रेज' आहे. युवा नेत्यांना संधी ही काँग्रेसचेही धोरण ठरलेले आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून प्रणितीताई शिंदे दिसल्या तरी आश्चर्य वाटायला नको.

या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास सहा विधानसभा मतदारसंघाचा भाग समाविष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना संधी मिळाली तर त्या मतदारसंघातील सध्याच्या स्थितीचा कसा फायदा घेतील हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. तर दुसरीकडे भाजपकडून उमेदवाराची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावर सर्वकाही अवलंबून आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Solapur | Praniti Shinde
Shiv Sena MLA Disqualification : ठाकरे गटाचे टेन्शन वाढले; 'आमदार अपात्रता' सुनावणी पुन्हा लांबणीवर, 'या' तारखेला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com