Kharge News : महाराष्ट्र मर्दांची भूमी; पण शिंदे, पवार अन् चव्हाणांनी लाज आणली; खरगेंची बोचरी टीका

Eknath Shinde, Ajit Pawar, Ashok Chavan : ही निवडणूक देशाच्या भविष्य ठरवणारी आहे. देश वाचवण्यासाठी संविधान, लोकशाही टिकवणे गरजेचे आहे. भाजप आणि आरएसएसला संविधन संपवायचे आहे. त्यासाठी त्यांना या निवडणुकीत एकहाती सत्ता हवी आहे.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSarkarnama

Maharashtra Political News : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे भाषण म्हटले की विरोधकांची सरसकट खरडपट्टी आलीच. त्याची प्रचिती धुळ्यातील सभेत आली. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेसचे विचार सोडून भाजपमध्ये किंवा त्यांच्या पंगतीला जाऊन बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशोक चव्हाण आणि अजित पवारांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.

धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ खरगे धुळ्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र ही मर्दांची भूमी आहे. येथील काही नेते मात्र दबावापुढे झुकले. एकनाथ शिंदे Eknath Shinde, अशोक चव्हाण आणि अजित पवारांनी भाजपसमोर साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या वागण्याने लोकांना लाज वाटत आहे, अशी बोचरी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी केली. या टीकेला संबंधित नेते काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.

यानंतर मल्लिकार्जुन खरगेंनी Mallikarjun Kharge आपला मोर्चा भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वळवला. ते म्हणाले, ही निवडणूक देशाच्या भविष्य ठरवणारी आहे. देश वाचवण्यासाठी संविधान, लोकशाही टिकवणे गरजेचे आहे. भाजप आणि आरएसएसला संविधन संपवायचे आहे. त्यासाठी त्यांना या निवडणुकीत एकहाती सत्ता हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ४०० हून अधिक जागा निवडून आणायच्या आहेत. मात्र तुमचा-आमचा मालक ही जनता असून ती ठरवेल कुणाला किती जागा द्यायच्या ते, अशा शब्दात खरगेंनी पंतप्रधान मोदींना सुनावले आहे.

Mallikarjun Kharge
Raj Thackeray Sabha : शरद पवारांनी राज्यात पहिल्यांदा फोडाफोडीचे राजकारण केलं; राज ठाकरेंनी सगळंच काढलं

नरेंद्र मोदींची Narendra Modi गॅरंटी खोटी असल्याची टीका खरगेंनी केली. ते म्हणाले, मोदी खोटे बोलतात. त्यांनी १५ लाख देणार असे सांगितले होते, त्याचे काय झाले? आता मोदी देश मजबूत करायचा असल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांनी ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणून विरोधातील शेकडो नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. तुरुंगवास टाळण्यासाठी अनेक विरोधकांना धमकावून भाजपात घेतल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींनी हिमंत दाखवावी

पंतप्रधान मोदींनी तेलंगणातील सभेतून उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी Gautam Adani हे टेम्पोत भरून काँग्रेसला पैसे पुरवत असल्याचा आरोप केला होता. याचा समाचार घेताना खरगे म्हणाले, मोदींनी हिंमत असेल तर या उद्योगपतींच्या विरोधात ईडी, सीबीआय, आयटीची कारवाई करावी. त्यातूनच देशाला समजेल कोण किती खरे आहे ते, असे आव्हानही खरगेंनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Mallikarjun Kharge
Hindu Mahasangh Warning : आम्हाला ‘नथूराम’ व्हायला भाग पाडू नका ; ब्राह्मण महासंघाचा छगन भुजबळांना इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com