MLA Mangesh Chavan : 'मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त, आपण दणदणाट निधी आणतो आणि.. ' ; भाजप आमदार मंगेश चव्हाणांचं विधान!

Jalgaon Lok Sabha Constituency : 'एखाद्या गावातील जनतेने कामासाठी जर निधी मागितला तर त्यासाठी आपण...'असंही आमदार चव्हाण म्हणाले आहेत.
MLA Mangesh Chavan
MLA Mangesh ChavanSarkarnama

Loksabha Election 2024 : मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त आहे,त्यामुळे आपण दणदणाट निधी आणतो आणि पैसे वाटतो असे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षातर्फे(BJP) माजी आमदार स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचाराची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सद्या ते मतदारा संघात विविध ठिकाणी बैठका घेत आहेत.

विशेषत: चाळीसगाव मतदार संघात ते मतदारांशी प्रत्येक गावात जावून संपर्क साधत आहेत. काही ठिकाणी कॉर्नर सभाही घेत आहेत.अशीच चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घेतलेल्या त्यांच्या सभेची एक क्लीप व्हायरल झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Mangesh Chavan
Jalgaon Lok Sabha Constituency : भाजप माझे तिकीट बदलणार नाही, स्मिता वाघ यांचा विश्वास !

मंगेश चव्हाण(Mangesh Chavan) सध्या जनतेला आपण आमदार म्हणून विकास निधीच्या माध्यमातून केलेल्या कामांची आणि आणलेल्या निधीची साक्ष पटवून देत आहेत. त्यांनी मतदार संघाच्या विकासासाठी वेळोवेळी निधी आणलेला असल्याचे सांगितले, यावेळी ते म्हणाले, 'आपण जे बोलतो ते करतो याचा कोणताही गाजावाजा करीत नाही, तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही झाले, झाले ना! तुम्हाला मिळायला पाहिजे हेच आपले ध्येय असते, कसे बसवायचे ती माझी कला आहे, मंत्रालयातील तिजोरीवाला आपला दोस्त आहे, त्यांच्या माध्यमातून आपण दणदणाट निधी आणतो तो वाटतो.'

तसेच, 'मंत्रालयात ज्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या असतील ते आपले दोस्त आहेत. यात देवा भाऊ (देवेंद्र फडणवीस), गिरीशभाऊ (गिरीश महाजन)असतील किंवा मंत्रिमंडळातील सहकारी असतील. त्यांच्याकडे तिजोरीच्या चाब्या असतात ते आपले दोस्त असल्यामुळे जेंव्हा लागेल तेंव्हा आपण तिजोरी खोलतो आणि निधी वाटतो. एखाद्या गावातील जनतेने कामासाठी जर निधी मागितला तर त्यासाठी आपण नाही म्हणायचे का? आपण काम करतोच! नाही म्हणायचे आपले काम नाही.' असं मंगेश चव्हाण म्हणाले.

आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या ते विश्‍वासातील मानले जातात. जळगाव जिल्ह्यात जिल्हा दूध विकास संघात त्यांनी एकनाथ खडसे यांच्या पॅनलचा पराभव करून आपली सत्ता प्रस्थापीत केली आहे. जळगाव जिल्हा दूध संघाचे ते चेअरमनही आहेत.

MLA Mangesh Chavan
Loksabha Election 2024 : युती धर्मामुळे मंत्री विखे अडकले शिर्डीत; पुत्र खासदार सुजय नगरमध्ये एकटे पडले!

भारतीय जनता पक्षातून शिवसेना(Shivsena) ठाकरे गटात गेलेले खासदार उन्मेश पाटील व आमदार मंगेश चव्हाण हे चाळीसगाव येथीलच आहेत. एकेकाळी दोघेही जीवलग मित्र होते परंतु त्यांचे अंतर्गंत वाद झाल्याने दोघे एकमेकांचे राजकीय शत्रू झाले आहेत. तर मंगेश चव्हाण यांच्या विरोधामुळेच आपली भाजपची उमेदवारी गेल्याचा आरोप उन्मेश पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ते आता शिवसेना ठाकरे गटातून चाळीसगाव विधानसभा निवडणूकीत मंगेश चव्हाण यांना आव्हाण देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

परंतु आता लोकसभा निवडणूकीतच दोघांचा सामना आहे. उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांना विजयी करण्याचा विडा उचलला आहे. तर मंगेश चव्हाण यांनी भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना विजयी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्रमकपणे प्रचार सुरू केल्याचे दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com