Nashik Politics : मैत्रीत कुस्ती ! शिवसेनेला रोखण्यासाठीच भाजपने नाशिकमध्ये घाई केली

Nashik Politics heats up as BJP moves to counter Shiv Sena Shinde group’s influence : महायुती म्हणून भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस एक सोबत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकद दाखवण्यासाठी या तीन्ही पक्षांत स्पर्धा सुरु झाली आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik politics : महायुती म्हणून भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस एक सोबत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकद दाखवण्यासाठी या तीन्ही पक्षांत स्पर्धा सुरु झाली आहे. नाशिकमध्ये या स्पर्धेत राष्ट्रवादी तरी सध्या कुठे दिसत नसली तरी शिवसेना व भाजपमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप यांच्यासह इतरांना प्रवेश न दिल्यास ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी भीती भाजपला होती. तसे झाले असते तर नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढली असती. त्यामुळे भाजपने आपल्याच पक्षातील आमदारांची व पदाधिकाऱ्यांच्या विरोधाची धार कमी करुन मोठा पक्षप्रवेश घडवून आणला. शिवसेनेला शह देणे एवढाच त्या मागचा उद्देश असल्याचं आता स्पष्टपणे समोर आलं आहे.

त्यामुळे बडगुजर हे केवळ निमित्त होते, नाशिकमध्ये खरी लढत तर भाजप व शिवसेनेत होताना दिसत आहे. भाजपला नाशिक महापालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थिती जिंकायची आहे. त्यासाठी भाजपने महापालिका निवडणुकीसाठी शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपने विरोधी पक्षातील चांगले चेहरे हेरले व शिवसेनेच्या आधी त्यांना गळाला लावलं. परंतु भाजप एवढ्यावरच थांबलेलं नाही, भाजपची आता शिवसेना(शिंदे गट) च्या नगरसेवकांवरही डोळा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Nashik News : प्रसूती वेदनेत तळमळणाऱ्या महिलेच्या मदतीला शिवसैनिक देवा सारखे धावून आले, नशेत झिंगाट असलेल्या डॉक्टरला दिला चोप

भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांना आपल्या कंपूत घेण्याच्या हालचाली सूरु केल्या आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) नाशिकरोड व सिडको या भागातील दोन नगरसेवकांना भाजपत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेचे हे दोन्ही नगरसेवक देखील पक्षातील अंतर्गत वादामुळे त्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ते भाजपात आल्यास शिवसेनेसाठी तो मोठा धक्का असेल.

दरम्यान उद्धव सेनेतून नगरसेवक फोडताना शिवसेनाही मागे नाही. भाजपमध्ये प्रवेशसोहळे होत असताना शिवसेनेने देखील उद्धव सेनेतील अनेक सैनिक आजवर आपल्या गळाला लावले आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांची ताकद वाढवत आहेत. मात्र आता मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिंदेसेनेकडे मोर्चा वळवल्याने शिंदे सेनेमध्येही अस्वस्थता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आजवर दोघांमधील ही स्पर्धा एखाद्या शीतयुद्धा प्रमाणे होती, ती आता उघडपणे दिसू लागली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Balasaheb Thackeray : शिंदेंनी दिलेला शब्द पाळला; आता नाशिककरांना शिवसेनाप्रमुख जवळून अनुभवता येणार, संवादही साधता येणार..

विशेष म्हणेज भाजपचा हा डाव आता शिवसेनेच्या लक्षात आला आहे. परंतु शिंदे सेनेतील हे दोन माजी नगरसेवक फोडण्याची जबाबदारी भाजपने महाविकास आघाडीमधून येणाऱ्या काही माजी नगसेवकांवर सोपावली आहे. त्यातून त्यांचा स्वतंत्र गट तयार करुन तो भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसे झाल्यास शिंदे सेनेला भाजपवर कोणताही आक्षेप घेता येणार नाही. त्यादृष्टीने भाजप पुरेपुर काळजी घेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com