Manikrao Kokate Politics: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विरोधकांना बस स्थानकाचा मुद्दा लिफ्ट करील का?

Manikrao Kokate: Kokate opposition, embroiled in politics, got a political tool of rain -मुसळधार पावसामुळे बस स्थानक कोसळल्याने सिन्नरच्या राजकारणात बाजूला गेलेल्यांना मिळाला नवा मुद्दा.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate news: लोकसभेत राजाभाऊ वाजे आणि विधानसभेत माणिकराव कोकाटे स्थिर झाले आहेत. त्यामुळे सिन्नरच्या राजकारणातील दोन्हीही मुख्य प्रवाहातील नेते सध्या मस्त आहेत. यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधकांना आपले अस्तित्व दाखविण्याची संधी हवी होती.

दोन दिवसांपूर्वी सिन्नरला मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांवर कृपा केली की अवकृपा हा चर्चेचा विषय आहे. या पावसात शेतीचे नुकसान झाले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट संबंध असलेले बीओटी तत्त्वावरील बस स्थानक कोसळले.

बस स्थानक कोसळल्याने कृषी मंत्री कोकाटे विरोधकांना एक नवा राजकीय मुद्दा मिळाला आहे. या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शांत झालेल्या सिन्नरच्या (नाशिक) राजकारणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. उदय सांगळे यांच्या इशाऱ्यानंतर सामाजिक संघटनांनी आंदोलन हाती घेतले आहे. या संदर्भात एक आगळे वेगळे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.

Manikrao Kokate
Shivsena UBT Politics: धुळ्यात शिवसेना ठाकरे पक्ष लागला निवडणुकीच्या तयारीला, काय असेल रणनीती?

सामाजिक कार्यकर्ते शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भीक मांगो आंदोलन केले. सिन्नरच्या बस स्थानकाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मुळेच बस स्थानक कोसळले. भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. मिताने नागरिकांकडे भीक मागण्यात आली. जमा झालेले १६३० रुपये कृषीमंत्र्यांना पाठविण्यात आले.

Manikrao Kokate
Nandurbar Politics: भाजप आमदारानं शिवसेना आमदाराच्या पुत्राला केलं गेट आऊट; भांडे वाटपावरून जुंपली!

सिन्नर तालुक्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हा गोंधळाचा विषय आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खासदार राजाभाऊ वाजे आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे या दोन प्रमुख विरोधकांनी सोयीचे डाव टाकले. त्यामुळे सध्या दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्ते सुस्त आहेत. उपस्थितीत कोकाटे विरोधकांपुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे.

सिन्नर तालुक्याला प्रदीर्घ काळानंतर राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही आनंदात आहे. सिन्नर तालुक्याचे राजकारण कोण किती काम करतो याला फारसे महत्त्व दिले जात नाही. अशा स्थितीत कोकाटे विरोधकांनी केलेल्या आंदोलनाची राजकीय चर्चा जोरात आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com