Manikrao Kokate Politics: कृषिमंत्र्यांची तत्परता... बातमी येताच तासाभरात सुरू झाले सिन्नरला पंचनामे!

Manikrao Kokate; Panchnama started in Sinnar two days ago, Agriculture Minister Kokate in the constituency today-सिन्नरला यंदा पावसाने अक्षरशा झोडपल्याने आज कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: आवर्षणग्रस्त सिन्नरला यंदा बेमोसमी पावसाने भरभरून दान केले. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने शेती व शेतकरी दोघेही संकटात सापडले आहे. या शेतकऱ्यांना शासनाकडून काय दिलासा मिळतो याची प्रतीक्षा आहे. यावरून राजकारण देखील सुरू आहे.

सिन्नर मतदारसंघात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. तीन दिवसांपूर्वी नाशिकला दोन तासांत १४४ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कार्यालय असलेल्या बिओटी तत्त्वावरील सिन्नर बस स्थानकाचा काही भाग कोसळला. दोन बसेश्वर स्लॅब कोसळला मात्र सुदैवाने प्राणहानी झाली नाही. शहरातील घरात अनेक ठिकाणी पाणी शिरले होते.

या पावसाने तालुक्यातील कोरड्या पडलेल्या अनेक नद्यांना पूर आला. शेतीमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शेतीत साठवलेला कांदा आणि अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबतच्या बातम्या झळकताच तासाभरातच तहसीलदारांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले. नाशिक कृषी विभाग आणि महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे देखील सुरू केले आहे.

Manikrao Kokate
Anil Gote : अद्याप गुन्हा का नाही? गृहखात्याची प्रतिमा डागाळली, अनिल गोटेंनी पोलिसांवर शंका घेत थेट फडणवीसांना केलं टार्गेट

यासंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पंढरपूर दौऱ्यावर होते. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहून नियोजित कार्यक्रमासाठी ते अन्य जिल्ह्यात होते. मात्र तहसीलदार, कृषी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना त्यांनी विविध सूचना केल्या होत्या. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे झाले.

Manikrao Kokate
Manikrao Kokate Politics: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विरोधकांना बस स्थानकाचा मुद्दा लिफ्ट करील का?

या निमित्ताने विरोधकांनी केलेल्या आरोपांना देखील कृषिमंत्र्यांनी तात्काळ कृतिशील उत्तर दिले आहे. सिन्नर बस स्थानक हे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आले आहे. शासनाचा कोणताही निधी खर्च झालेला नाही. बस स्थानक कोसळल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत. बस स्थानकात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी कृषिमंत्री आपल्या मतदारसंघात भेट देणार आहे. यावेळी ते शहरातील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी करतील. शेतकरी आणि कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहे. त्यामुळे पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांबाबत कृषिमंत्री काय घोषणा करतात. याची उत्सुकता आहे.

तालुक्यात समृद्धी महामार्गामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. महामार्गावरील पाणी वाहून जाण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यवस्था नाही. या हे पाणी थेट लगतच्या शेतात शिरत आहे. पिकांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संदर्भात सायंकाळी कृषिमंत्री कोकाटे संबंधित शेतकऱ्यांची आणि एमएसआरडीसी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील, ते सांगण्यात आले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com