Raj Thackeray MNS : मनसेचे तीन दिवसीय गुपित मिशन, 'कपड्यांच्या बॅगा घेऊन येण्याचं सर्वांना फर्मान..

Raj Thackeray’s MNS organizes a 3-day state-level camp in Igatpuri, Nashik : या शिबिरासाठी मनसेने एकेकाळी आपला बालेकिल्ला असलेल्या नाशिकची निवड केली आहे. या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

MNS Nashik meeting : हिंदी सक्तीविरोधातील यशानंतर मनसेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूच्या युतीसंदर्भात चर्चा होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे हे अॅक्शन मोडवर आले असून मनसेकडून उद्यापासून तीन दिवस राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी मनसेने एकेकाळी आपला बालेकिल्ला असलेल्या नाशिकची निवड केली आहे. जिल्ह्यातील इगतपुरी येथील कॅमल रिसॉर्ट येथे मनसेचे तीन दिवसीय शिबिर होणार आहे. हे शिबीर उद्यापासून ( दि. 14 जुलै) सुरू होणार असून 16 जुलैपर्यंत चालणार आहे. या शिबिरात संपूर्ण राज्यभरातून मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता 'कपड्यांची बॅग घेऊन शिवतीर्थावर हजर रहा', दोन दिवसांसाठी मुंबईबाहेर कार्यशाळेसाठी जायचे आहे. असे फर्मान राज ठाकरेंनी जारी केल्याचे सांगितले जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या शिबिरात उपस्थित राहणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती, दिशा आणि कार्यपद्धती यावर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याच्या संदर्भातील काय तो निर्णय याच शिबीरात घेतला जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

Raj Thackeray
Sanjay Gaikwad Controversy : गुन्हा दाखल झाला तरी आमदार संजय गायकवाड काही सुधरेणात, आता अधिकाऱ्यांच्या आय बहीण...

दरम्यान या शिबिरासंदर्भात गुप्तता पाळण्याचे व याबद्दल कुठेही बोलू नये अशी तंबी नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरेंनी नुकताच कार्यकर्त्यांना एक स्पष्ट आदेश दिला आहे. पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही. अशी तंबी राज ठाकरेंनी दिली आहे. त्यामुळे मनसेचे काहीतरी गुपित मिशन सुरु असल्याची चर्चा आहे.

Raj Thackeray
Gulabrao Devkar : घड्याळ हातात घातलं, पण संकट टळलं नाही ! गुलाबराव देवकर 10 कोटींच्या कर्ज प्रकरणात दोषी

नाशिकमध्ये यापूर्वी देखील मनसेचे राजस्तरीय शिबीर झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनसेच्या राज्यशिबिरासाठी नाशिकची निवड केल्याने चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायची की नाही? याबाबत मनसेच्या शिबिरात राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com