Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं दुसरं मंत्रिपदही धोक्यात, सदनिका प्रकरणात सत्र न्यायालयाचा धक्कादायक निर्णय

Sadanika scam case : माणिकराव कोकाटे यांना विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडीओ भोवला होता. त्यांचे कृषीमंत्रीपद त्यांनी गमावलं. त्यानंतर आता त्यांना मिळालेलं क्रीडामंत्रीपदही धोक्यात आहे.
Minister Manikrao Kokate
Minister Manikrao Kokate Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : फडणवीस सरकारमधील क्रीडामंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. सदनिका प्रकरणात त्यांना झालेली दोन वर्षांची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली.

तीस वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री स्वेच्छा निधीतील दहा टक्के योजनेतील सदनिका घेतली होती. स्वतः तसेच बंधू विजय कोकाटे यांच्या नावे त्यांनी दोन सदनिका घेतल्या होत्या. बनावट कागदपत्रे सादर करून या सदनिका त्यांनी लाटल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास व 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा त्यांना ठोठावली होती. मात्र त्यावेळी निकालानंतर काही तासात त्यांना जामीन मंजूर झाल्याने व शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांचे मंत्रीपद वाचले होते. न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली होती. मात्र याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयानेही कोकाटे यांना सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे.

Minister Manikrao Kokate
Rajabhau Waje : नाशिकसाठी 'गेमचेंजर' ठरणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कला विलंब का? खासदार राजाभाऊ वाजे संसदेत गरजले..

त्यामुळे कृषीमंत्रीपद गमावून क्रीडामंत्री झालेल्या कोकाटे यांच्या मंत्रिपदावर पुन्हा एकदा गंडातर आल्याचे दिसते. त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून त्यांच्या राजकीय भवितव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे मंत्रीपद जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शासकीय कोट्यातील दहा टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरण कोकाटेंना भोवण्याची चिन्ह आहेत. प्रथमवर्ग न्यायालयाने दोन वर्ष कारावास व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा त्यांना दिली होती. ती शिक्षा जिल्हा न्यायालयाने आज कायम ठेवली आहे. त्यामुळे कोकाटे आता याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

Minister Manikrao Kokate
Girish Mahajan : तपोवन वादात एकट्या पडलेल्या गिरीश महाजनांनी गेम फिरवला, त्र्यंबकचे साधू उतरवले नाशिकच्या मैदानात

दरम्यान यापूर्वी पहिल्यांदा प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना जेव्हा शिक्षा सुनावली होती त्यावेळेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. आता तर शिक्षेची पुष्टी झाल्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून पुन्हा यावेळीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे आता कोकाटे पुढे काय पाऊल उचलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com