Girish Mahajan : तपोवन वादात एकट्या पडलेल्या गिरीश महाजनांनी गेम फिरवला, त्र्यंबकचे साधू उतरवले नाशिकच्या मैदानात

Tapovan tree cutting : तपोवनातील वृक्षतोडीला सुरुवातीला फक्त गिरीश महाजन यांचेच समर्थन होते. त्यामुळे ते एकाकी पडल्याचे चित्र होते. पण आता महाजन यांनी अशी काही खेळी खेळली आहे की सगळं गणित फिरलं आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणाऱ्या साधू-महंताच्या राहण्याची सोय करण्यासाठी तपोवनात साधूग्राम उभारले जाणार आहे. मात्र त्यासाठी १८०० झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी त्याविरोधात आंदोलन सुरु केलं. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी वृक्षतोडीचे समर्थन केल्याने आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांनीही वृक्षतोडीला विरोध करत आंदोलनाला पाठिंबा दिला.

त्यानंतर आमदार रोहित पवार, शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, लेखक अरविंद जगताप यासगळ्यांनी अनुक्रमे या आंदोलनात उडी घेतली. पर्यावरणप्रेमींच्या मागे जनाधार वाढत चालला होता. शहरातील आमदार व मंत्री देखील गप्प होते. त्यामुळे तपोवन वादात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन एकटे पडल्याचे चित्र होते.

पर्यावरणप्रेमींनी मंत्री गिरीश महाजन यांना लाकडूतोड्या असे संबोधले. हातात कुऱ्हाड, करवत घेऊन उभे असलेल्या महाजनांचे कार्टुन बनले. या आंदोलनात कुंभमेळामंत्री या नात्याने पूर्णपणे महाजन हेच टार्गेट झाले. सुरुवातीला काही साधू-महंतांनीही पर्यावरणाचे संवर्धन व्हायला हवे अशी भूमिका मांडली होती. पंरतु आता मंत्री गिरीश महाजन यांनी आख्खा गेमच फिरवला आहे.

Girish Mahajan
Girish Mahajan : माझे कार्टून बनवले, मला लाकूडतोड्या म्हटले.. गिरीश महाजनांच्या लागलं जिव्हारी

तपोवन वादात एकट्या पडलेल्या गिरीश महाजनांच्या मदतीसाठी चक्क त्र्यंबकेश्वरचे साधू नाशिकच्या मैदानात उतरले. आजवर कधीही नाशिकमध्ये फारसा रस न घेतलेल्या त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतानी चक्क गोदाघाटावर येत गंगापूजन केलं. १८०० झाडे तोडली जात असतील तर त्याबदल्यात १८ हजार झाडे लावू या शब्दात वृक्षतोडीचं समर्थन केलं.

नाशिक महापालिकेने तपोवनातील आखाड्यांना (मंदिरांना) आरक्षणासंदर्भात नोटिसा बजावल्याने नाशिकचे साधू-महंत नाराज आहेत. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहेत. असे असताना मात्र त्र्यंबकेश्वरचे साधू-महंत हे गिरीश महाजनांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे एकट्या पडलेल्या गिरीश महाजनांना मोठा आधार मिळाला आहे.

गिरीश महाजन यांनी सुरु केलेल्या वृक्ष लागवड मोहिमेला या सर्व-साधू-संतानी पाठिंबा दिला आहे. काल (दि. १५) नाशिकच्या मखमलाबाद परिसरात झालेल्या वृक्षलागवड प्रसंगी हे सगळे साधू-महंतही उपस्थितीत होते. मंत्री महाजन यांनी हरित नाशिकचा संकल्प केला आहे. या उपक्रमासह कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी आम्ही मंत्री यांच्यासोबत आहोत असे ठामपणे साधू-महंतानी सांगितले.

Girish Mahajan
Tapovan Controversy : गिरीश महाजनांकडून तपोवन वादाचे 'डॅमेज कंट्रोल', नाशिकमध्ये 1 हजार झाडे लावायला सुरुवात

काही विरोधकांकडून कुंभमेळा आणि साधुसंतांविषयी अपप्रचार केला जात आहे, अशा प्रकारची तानाशाही चालू देणार नाही. २५ हजार कोटीतून या शहरासाठी विकासकामे व सुविधा उभ्या राहणार असून, त्या समाजातील सर्वच घटकांसाठी असल्याचे सांगत विरोधकांकडून होत असलेल्या अपप्रचाराचा खरपूस समाचार साधू महंतांनी घेतला. यावेळी हरिगिरीजी महाराज, स्वामी भागवतानंद, स्वामी शंकरानंद, जनार्दन हरी महाराज यांनी देखील आपआपली मते मांडली.

साधू-मंहतांनी देलेल्या या बूस्टमुळेच काल गिरीश महाजन यांचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसला. मग त्यांनीही कुंभमेळा ही आमची अस्मिता असून कुंभमेळा व साधुसंत-महंतावरील टीका खपवून घेतली जाणार नाही असा दम पर्यावरणवाद्यांना भरला. याशिवाय नाशिकचे तीन व त्र्यंबकेश्वरचे दहा अशा तेराही आखाड्यांना प्रत्येकी १ कोटी याप्रमाणे तेथील परिसरात दुरुस्ती, टॉयलेट, पाणीपुरवठा व इतर सुविधा करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com