Manikrao Kokate : एक्का, दुर्री, तिर्री... दोन प्रकरणांमध्ये वाचलेले कोकाटे तिसऱ्या प्रकरणात 'पॅक' होणार?

Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर माणिकराव एक अन् वाद अनेक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुन्हा त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
Manikrao Kokate Ajit Pawar
Manikrao Kokate Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर माणिकराव एक अन् वाद अनेक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी मंत्री झाल्यापासून कोकाटे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मात्र याआधीच्या दोन प्रकरणांमध्ये वाचलेले कोकाटे तिसऱ्या प्रकरणात मात्र पुरते अडकले आहेत.

कोकाटे यांचा विधिमंडळांमध्ये रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्याने त्यांच्यावर विरोधकांनी चौफेर हल्ला चढवला आहे. राज्यातला शेतकरी आत्महत्या करतोय अन् इकडे कृषीमंत्री गेम खेळताय. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबदद्ल गांभीर्य नाही. असा कृषीमंत्री नको म्हणून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. त्यामुळे कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याआधी सर्वप्रथम कोकाटे अडचणीत आले ते शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणात. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी १९९५ मध्ये आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा कोट्यातील १० टक्के आरक्षित सदनिका मिळवल्याचा आरोप होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 1995 ते 1997 च्या काळातील हे प्रकरण होतं.

१९९७ मध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कोकाटे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात जवळपास तीस वर्षांनी निकाल देताना नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटे व त्यांच्या बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याचवेळी त्यांच्या मंत्रीपदावर व त्या पाठोपाठ आमदारकीवर टांगती तलवार होती.

कारण सध्याच्या कायद्यानुसार, कोणत्याही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीस दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. मात्र कोकाटे यांनी याविरोधात सत्र न्यायालयात अपील केलं होतं. सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. पुढे याप्रकरणातून त्यांची अलगद सुटका झाली.

Manikrao Kokate Ajit Pawar
Girish Mahajan Politics : उज्वल निकम यांची नियुक्ती केवळ खासदारकीसाठी नसेल ; गिरीश महाजनांनी दिले मोठे संकेत : रक्षा खडसेंच्या मंत्रि‍पदावर टांगती तलवार?

परंतु त्यानंतर कोकाटे पुन्हा अडचणीत आले ते त्यांनी वारंवार शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे. कृषीमंत्री असूनही कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी नको ती वक्तव्य केली. कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी केलेल्या 'भिकारी सुद्दा एक रुपया घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा देतो. या वक्तव्यामुळे वाद उफाळला होता.

त्यानंतर नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कोकाटे यांनी कर्जमाफीच्या व पिक विम्याच्या पैशातून घरातील लग्न, साखरपुडे करतात असे शेतकऱ्यांना उद्देशून म्हटलं होतं. नुकसानग्रस्त कांदा पिकाच्या पंचनाम्यासंदर्भात बोलताना शेतात जे कांदे आहेत, त्याचे पंचनामे होतील, कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का ? असा सवाल कोकाटे यांनी केला होता. कोकाटे यांच्या या व इतर सर्व वादग्रस्त सगळ्या विधानांवरुन शेतकरी व विरोधक आक्रमक झाले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करु लागले. दरम्यान अजित पवार यांनी कोकाटे यांना तंबी दिली. त्यानंतर कोकाटे यांनी काहीसा सावध पवित्रा घेतला.

Manikrao Kokate Ajit Pawar
Eknath Khadse on Honey Trap : महाजनांशी संबंध आले अन् गरीब लोढा कोट्याधीश् झाला, एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप

मात्र आता माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या अधिवेशनादम्यान ऑनलाइन रमी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस(शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडीओवरुन विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना कोकाटे यांची दमछाक झाल्याचे दिसून आले. त्यांनी आपण गेम खेळत नव्हतो तर आलेली जाहीरात स्कीप करत होतो असं स्पष्टीकरण त्यावर दिलं आहे. मात्र विरोधकांनी त्यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी लावून धरली आहे.

कोकाटे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. याच कारणामुळे छगन भुजबळ यांना डावलून अजित पवार यांनी कोकाटे यांना मंत्री केलं. तेही कृषी खात्यासारखं महत्वाचं खातं दिलं. परंतु कोकाटे यांची कार्यशैली, वादग्रस्त वक्तव्य हे पक्ष व अजित पवार यांनाच गोत्यात आणणारी ठरु लागली आहेत. दरम्यान पक्षाने त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. कृषीमंत्र्यांकडून जे घडलं ते अयोग्य आहे. पक्ष त्यांच्याबद्दल योग्य तो निर्णय घेईल असं सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता आजवर कोकाटे यांचे सगळे अपराध पदरात घेऊन त्यांची निर्दोष सुटका करणारे अजित पवार यावेळी त्यांना बाजुला करुन आपली वाट काढतील की पुन्हा निर्दोष सुटका करतील हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com