Suhas Kande Politics : आमदार सुहास कादेंनी जाळं टाकलं, कॉंग्रेसचा एकमेव नगसेवक घेतला शिवसेनेत

Babbu Qureshi joins Shinde Sena : मनमाड नगरपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसचा एक नगसेवक निवडून आला. परंतु निवडणुकीनंतर आता या नगरसेवकाने आमदार कांदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Suhas Kande Politics
Suhas Kande PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक जिल्ह्यात ११ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला फक्त एकच जागा जिंकता आली. मनमाड नगरपरिदेत काँग्रेसच्या तिकीटावर बब्बू कुरेशी हे निवडून आले. पण आता बब्बू कुरेशी यांना आमदार सुहास कांदे यांनी गळाला लावलं असून त्यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिला आहे. नांदगाव येथे कांदे यांच्या उपस्थितीत कुरेशी यांचा पक्षप्रवेश झाला.

सोमवारी (दि. २९) आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या एकमेव नगरसेवक असलेल्या बब्बू कुरेशी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. कुरेशी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे नव्या नगरपरिषदांतील काँग्रेसचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. जिल्ह्यात ११ ठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांत काँग्रेसला ही एकमेव जागा मिळाली होती. तीही आता कॉंग्रेसच्या हातून निसटली आहे.

मनमाड नगरपरिषद निवडणुकीत प्रस्थापित व सत्तेतील पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करुन प्रभाग क्रमांक तीन मधून ९३५ मते मिळवून निवडून आलेले काँग्रेसचे बब्बू कुरेशी यांनी सत्ताधारी पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. कारण मनमाडमध्ये आमदार कांदे यांच्या नेतृत्वाखाली ३१ पैकी २४ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आल्याने येथे सेना-भाजप युतीला एकहाती सत्ता मिळाली आहे. नागरिकांनी विकासाला साथ दिल्याचे स्पष्ट झाल्याने हीच विकासाची तान छेडत कुरेशी यांनी कांदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Suhas Kande Politics
Nashik Politics : काकाने भाजपत प्रवेश करताच पुतण्या शिवसेनेते, दोन चुलत भाऊ आमने-सामने येण्याची शक्यता..

दरम्यान शिवसेनेत प्रवेशानंतर विकासासाठी आमदार सुहास कांदे यांच्या महायुतीसोबत जाण्याचा व शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला घेतल्याचे व माझ्या प्रभागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया कुरेशी यांनी दिली. कुरेशी यांच्या या निर्णयाने काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसला आहे.

Suhas Kande Politics
BJP NMC Election : महाजनांकडून आमदार फरांदे, हिरेंना जोरदार दणका; वाजतगाजत दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की

सुहास कांदे यांचे निर्विवाद वर्चस्व

मनमाड नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनेने नगरपालिकेवर एकहाती सत्ता काबीज केली. थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार योगेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण नाईक यांचा चुरशीच्या लढतीत पराभव करत विजय मिळविला. या निवडणुकीत शिवसेनेला २१, भाजपला १, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला २ अशा एकूण महायुतीच्या २४ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाला ४, राष्ट्रवादी काँग्रेसला १, काँग्रेसला १ आणि अपक्षाला १ जागेवर समाधान मानावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com