Manoj Jarange : रामलल्लाकडे काय मागणं मागितलं ? मनोज जरांगे म्हणाले...

Ayodhya Ram Temple : नगरमध्ये जरांगे-पाटलांनी घेतले प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama

Ahmednagar Political News : देशभरात अयोध्येतील राम मंदिर सोहळा साजरा केला जात असताना महाराष्ट्रात आरक्षणासाठी मराठा समाज मुंबईकडे रवाना झाला आहे. मराठा आंदोलक 26 जानेवारीला मुंबईत दाखल होऊन बेमुदत उपोषण करणार आहेत. दरम्यान, रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना मराठा आंदोलकांची पदयात्रा नगर जिल्ह्यात होती. यावेळी जरांगे-पाटलांनी रामलल्लाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

मनोज जरांगे म्हणाले, 'अयोध्येत मंदिराचे लोकार्पण होताना आम्ही नगरमध्ये भगवान श्रीरामांचे दर्शन घेतले. आरती केली आणि विधिवत पूजाही केली. आजचा दिवस हा आपल्या भारतवासीयांसाठी ऐतिहासिक आहे. देशभर उत्सव साजरा होत असून हा आनंदाचा दिवस आहे. अयोध्येत शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम विराजमान झाले आहेत. या आनंदाच्या क्षणात आम्ही नगरमधूनच सहभागी झालो आहोत,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange
Ravindra Dhangekar : काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना भाजपची ऑफर? ; 'या' नेत्याच्या विधानाने जोरदार चर्चा!

'देशभरात राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्याचा आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना केली. त्यामुळे हा कुण्या एका पक्षाचा सोहळा नाही. हा भारतवासीयांसाठी ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आहे. अयोध्येत राम आल्यानंतर रामभक्तांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे आजचा दिवस हिंदू धर्मासाठी गर्व आणि स्वाभिमानाचा आहे,' असेही जरांगेंनी यावेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी मराठा आरक्षणासाठी प्रभू श्रीरामांकडे काही मागणे मागितले का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, 'अयोध्येत आजच भगवान श्रीराम विराजमान झाले आहेत. त्यामुळे आजचा दिवस आनंदाचा असून हा क्षण साजरा करण्याचा आहे. त्यामुळे श्रीरामांकडे आज काही मागणे मागितले नाही. पण उद्या त्यांच्याकडे आरक्षणासाठी नक्कीच साकडं घालू. आज ते आल्याने फक्त आनंदच साजरा केला. तसेच मराठा आरक्षण मिळाल्यानंतर आम्हीही रेल्वे भरून अयोध्येला जाणार आहे,' अशी भावनाही जरांगेंनी व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Manoj Jarange
Ulhas Patil : कमळ हाती घेतलेल्या उल्हास पाटलांना काँग्रेसचा दणका; थेट सहा वर्षांसाठी निलंबित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com