Manoj Jarange: भुजबळांच्या इशाऱ्यानंतर जरांगेंचा पलटवार; “या वयात स्वतःची काळजी घ्या”, दिला सल्ला

Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal: ओबीसी घटकातून तुम्ही काय घेतले, आरक्षणाचे काय मुद्दे आहेत, यावर भुजबळ यांना कोणी विचारले आहे काय? मग ते प्रतिक्रिया देण्यासाठी अचानक कसे पुढे आले? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी केला.
Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News: मराठा-कुणबी दाखले वितरणातील प्रशासकीय अडथळे वादाचा विषय ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चेच्या फेरी सुरु आहेत.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने पुन्हा एकदा चालना मिळाली होती. या प्रश्नावर राज्यातील ओबीसी नेते आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र शुक्रवारी भुजबळ यांनी यातील त्रुटींवर बोट ठेवले होते.

मंत्री भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम झाल्यास राज्य सरकारला इशारा दिला होता. सत्ताधारी आमदार प्रसाद लाड यांचे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत सुरू असलेले प्रयत्नांकडे देखील भुजबळ यांनी लक्ष वेधले होते.

या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना विना विलंब उत्तर दिले आहे. भुजबळ यांच्या विधानावर त्यांनी थेट टोला हाणला केला. यावेळी जरांगे पाटील यांनी भुजबळांवर व्यक्तिगत हल्ला केल्याने तो चर्चेचा विषय आहे.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil
Sarathi Scholarship: मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथीचा मोठा निर्णय; परदेशी शिक्षणाची फी आता थेट संस्थेला

ओबीसी आरक्षणाच्या नावावर मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांवर जळफळाट व्यक्त करू नये. ओबीसी घटकातून तुम्ही काय घेतले, आरक्षणाचे काय मुद्दे आहेत, यावर भुजबळ यांना कोणी विचारले आहे काय? मग ते प्रतिक्रिया देण्यासाठी अचानक कसे पुढे आले? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी केला.

Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil
Professor Recruitment: प्राध्यापक भरती पुन्हा अडचणीत! UGC निकषांवर उच्च न्यायालयात याचिका, निवड यादीला ब्रेक

मंत्री भुजबळ यांनी या वयात आपल्या प्रकृतीची काळजी घेतलेली बरी, ओबीसी आरक्षणाच्या वादात त्यांनी पडू नये. कारण त्यांचा हेतू केवळ राजकारण आहे हे समाजालाही कळते.भुजबळ यांनी ओबीसी महामंडळ खाऊन टाकले, असा गंभीर आरोप जरंगे पाटील यांनी केला. केवळ ओबीसी महामंडळ नव्हे तर महाराष्ट्रही त्यांनी खाल्ला. आता या वयात त्यांनी फार वादात न पडता मुलगा आणि पुतण्याच्या राजकीय करिअरवर लक्ष द्यावे, असा टोमणा जरांगे पाटील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com