Narhari Zirwal Politics: सुहास कांदे पाठोपाठ नरहरी झिरवाळ का पोहोचले जरांगे पाटलांच्या भेटीला?... काय आहे प्रकरण?

Manoj jarange Patil; now Narhari Zirwal also need blessings from Jarange Patil-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनाही आता मनोज जरांगे पाटील फॅक्टरची वाटू लागली चिंता
Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Dhanraj Mahale & Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Assembly election 2024: विधानसभा निवडणुकीत माघारीची मुदत जवळ आल्याने राजकीय अस्वस्थता वाढत आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी या आदिवासी राखीव मतदार संघातील नरहरी झिरवाळ यांनीही आता पाठिंब्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे आदिवासी राखीव मतदार संघातून उमेदवारी करीत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे.

माजी आमदार धनराज महाले यांना शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. याशिवाय अन्य सात उमेदवार येथे आहेत. या स्थितीत मत विभागणीचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे झिरवाळ यांनी देखील विविध घटकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. आमदार झिरवाळ शुक्रवारी चक्क अंतरवेली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते.

Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Eknath Shinde politics: शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या माघारीसाठी अजित पवारांचे प्रयत्न यशस्वी होतील का?

यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. जरांगे पाटील यांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आमदार झिरवाळ यांनी जरांगे यांची भेट घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचा गट प्रभावी मानला जातो. सहकाऱ्यातील हा गट लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला होता. श्रीराम शेटे यांच्या विरोधात सहकारातील विविध नेते कार्यरत आहेत.

हे अल्पमतातील सर्व नेते सध्या माजी आमदार धनराज महाले यांच्या बरोबर गेले आहेत. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुनिता चारोस्कर आणि दुसरीकडे सहकारातील विभागलेली मते, यामुळे आमदार झिरवाळ अस्वस्थ झाले आहेत.

Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Girish Mahajan and Keda Aher : केदा आहेर बंडखोरी करत उमेदवारीवर ठाम, तर गिरीश महाजनांचा हिरमोड!

सध्या झिरवाळ मतदारसंघात प्रचार करण्यात व्यस्त आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी त्यांचे विरोधक सक्रिय झाल्याने सध्या मतदार संघात आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे.

त्यातच महायुतीतील बंडखोरी आमदार झिरवाळ यांच्यासाठी त्रासदायक ठरली आहे. माजी आमदार महाले यांच्याकडून झिरवाळ यांना लक्ष केले जात असल्याने ते अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेतूनच त्यांनी जरांगे पाटील यांची घेतलेली भेट राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय ठरली आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com