Maratha Reservation : कुणबी नोंदींसाठी पुरोहित संघांची मदत घेण्याचे निर्देश!

Maratha Kunbi reservation committee instructs Administratation to speed up for evidence-कुणबी मराठा आरक्षणासंदर्भात समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी प्रशासनाला सक्रिय होण्याचे निर्देश दिले.
Justice Sandeep Shinde
Justice Sandeep ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : नाशिकमध्ये मराठा आरक्षणासाठी कुणबी दाखले शोधण्यासाठी केवळ महसुली यंत्रणेवर विसंबून न राहता अगदी पुरोहित संघाच्या नोंदींचीही मदत घेण्याच्या सूचना या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी दिल्या.(Maratha Kunbi reservation committee took a meeting of revenue department In Nashik)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नियुक्त केलेल्या समितीची बैठक काल विभागीय महसूल आयुक्त (Maharashtra Government) कार्यालयात झाली. या वेळी विविध संस्थांकडील पुरावेदेखील शोधावेत अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Justice Sandeep Shinde
Maratha Reservation: जरांगे पाटील यांनी आमदार सोळंकेंना चांगलेच फैलावर घेतले!

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी कुणबी नोंदींबाबत तसे त्यावर आधारित दाखले देण्याबाबत सातत्याने आक्षेप नोंदविले आहेत. त्यांनी विविध शंका व्यक्त केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये या समितीने नोंदी व अन्य पुरावे शोधण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. या नोंदींसाठी पुरोहित संघांकडे असलेल्या नोंदींचादेखील शोध घेण्याच्या सूचना दिल्याने आरक्षणाच्या कामाला शासकीय स्तरावर गती मिळण्याची शक्यता आहे.

समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती शिंदे (निवृत्त) यांनी कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जात नोंदणीची कागदपत्रांची तपासणी केवळ महसूल अभिलेख पुरती मर्यादित न ठेवता इतर विभागांबरोबरच नागरिकांकडे उपलब्ध असलेले सबळ पुरावे तसेच अन्य संस्थांचीही मदत घ्यावी. याबाबत येत्या ८ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला नाशिकमध्ये काय दिशा मिळते हे येत्या एका आठवड्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

नाशिक रोडला विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन कक्षात समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी समितीतर्फे या सूचना देण्यात आल्या. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, समितीचे उपसचिव विजय पवार, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, ॲड. अजिंक्य जायभावे, जिल्हाधिकारी जलज शर्मा (नाशिक), सिद्धराम सलीमठ (नगर), अभिनव गोयल (धुळे), आयुष प्रसाद (जळगाव), मनीषा खत्री (नंदुरबार), मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, उपायुक्त रमेश काळे, विठ्ठल सोनवणे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आदींसह जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Justice Sandeep Shinde
Assembly Elections Results 2023 : दिग्गजांचे राजकीय भवितव्य टांगणीला, मतमोजणीचे कल पाहून अनेकांची धडधड वाढली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com