Nashik Maratha Morcha : `मराठा` समाजात दहशत निर्माण करण्यासाठीच लाठीमार केला!

Maratha morcha agitation in Nashik to condemned Jalna police action on Maratha hunger strikers-नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला
Maratha kranti morcha agitation
Maratha kranti morcha agitation Sarkarnama

Nashik News : शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्यांसाठी उपोषण करणे हा लोकशाहीतील हक्क आहे. त्यांच्यावर लाठीमार म्हणजे केवळ अत्याचार आहे. दहशत निर्माण करून मराठा समाजाने पुन्हा आंदोलनच करू नये असा राज्य सरकारचा डाव आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. (Maratha community agitation and appeal for Bandh in Nashik)

जालना येथे मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावे यासाठी उपोषण करणाऱ्यांवर बेछूट लाठीमार झाला. (Police) त्याची तीव्र निषेध नाशिकला (Nashik) करण्यात आला. शहरात बंद पुकारण्यात आला होता.

Maratha kranti morcha agitation
Maratha Andolan : नाशिक शहरात पोलिसांच्या सायबर सेलकडून ‘वॉच’

जालना येथील घटनेची अतिशय संतप्त प्रतिक्रीया नाशिकमध्ये उमटली. काल त्याबाबत शहरातील मेहेर चौकात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रास्ता रोको झाला. जिल्ह्यात विविध गावांमध्ये बंद पाळण्यात आला. तणावग्रस्त स्थिती असल्याने पोलिस देखील दबावाखाली आहेत.

आज सकाळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जमले. यावेळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, समन्वयक करण गायकर यांसह विविध नेत्यांनी भाषणे करून राज्य सरकारचा निषेध केला.

Maratha kranti morcha agitation
Dhule Maratha Politics : रात्री मोर्चा काढत केला सरकारचा निषेध!

उपोषणस्थळी लाठीमार कधीच केला जात नाही. तसा लाठीमार झाला. पोलिसांनी घरांमध्ये घुसून महिला, मुलांना मारहाण केली. परिसरात ज्याप्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तो पाहता हा अतिशय नियोजनबद्ध प्रकार होता, हे स्पष्ट होते. थेट राज्य सरकारच्या सुचनेतूनच हे झाले आहे. मराठा समाजावर पोलिसी अत्याचार करून या समाजाने आरक्षणासाठी पुन्हा डोके वर काढूच नये, असा सरकारचा प्रयत्न दिसतो, असा आरोप उपनेते बागूल यांनी दिला.

Maratha kranti morcha agitation
Anil Gote News : ‘मराठा’ आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचले!

यावेळी शिवाजी सहाने, विलास शिंदे, माधवी पाटील, सविता जगताप, ममता शिंदे, अलका शिंदे, सुनिता गांगुर्डे, रागीनी अहिरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

Edited By- Sampat Devgire

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com