Shivsena News : आपल्या मागण्यांसाठी शांततेत धरणे धरणाऱ्या मराठा आदोलकांवर पोलिसांनी काल अमानुष अत्याचार केले. महिला, लहान मुलांवर लाठीमार करीत त्यांना जखमी केले. यातून एकनाथ शिंदे सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी प्रतिक्रीया शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. (Shicsena and swarajya party agitation in Dhule at night on Jalna Maratha issue)
जालना येथील पोलिस (Police) लाठीमाराची तीव्र प्रतिक्रीया धुळे (Dhule) शहरात उमटली. शिवसेना (Shivsena) स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्री मोर्चा काढत निषेध केला.
जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्याचा शिवसेना (उबाठा) महानगर शाखेने धुळ्यात राज्य सरकारचा निषेध केला. अमानुषपणे तरुणांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात करावे, अशी मागणी केली.
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या जुन्या इमारतीसमोर निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध केला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच एका दिवसात आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती. आरक्षण तर दिले नाही, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार केला, हाच या सरकारचा खरा व भेसुर चेहरा आहे, अशी टिका महानगरप्रमुख किरण जोंधळे यांनी केली.
घटनेची चौकशी व्हावी
जालना येथील आंदोलकांवरील हल्ल्याचा, सरकारच्या दडपशाहीचा छत्रपती युवराज संभाजीराजेप्रणीत स्वराज्य पक्षाचे प्रांतिक सदस्य निंबा मराठे यांनी तीव्र निषेध केला. मराठा समाज आरक्षणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू होते. मात्र त्या ठिकाणी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केला गेला या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. कुणाच्या सांगण्यावरून मराठा आंदोलकांवर लाठीमार झाला आहे याची सर्वंकष चौकशी व्हावी, अशी मागणी श्री. मराठे यांनी केली.
पक्षाचे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख धीरज पाटील, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, महिला आघाडीच्या हेमा हेमाडे, जयश्री वानखेडे, संगीता भागवत, प्रतिभा सोनवणे, भरत मोरे, विनोद जगताप, हेमंत बागूल, सागर निकम, सुनील चौधरी, शरद गोसावी, पिनू सूर्यवंशी, नितीन जडे, अक्षय पाटील, अमोल ठाकूर, अनिल शिरसाट, गुड्डू मिर्झा, मतीन शेख, बबलू शेख, खलील शेख, इजाज अन्सारी, तेजस सपकाळ, इश्तियाक अन्सारी आदींचा आंदोलनात सहभाग होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.