Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil, Devendra FadnavisSarkarnama

Maratha Reservation : ...तर चिथावणी देणाऱ्या भाजप नेत्यांचीही SIT चौकशी करा! सकल मराठा समाज आक्रमक

Manoj Jarange Patil : जरांगे-पाटील यांच्या एसआयटी चौकशीच्या आदेशामुळे मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते संतप्त, एसआयटी चौकशीच्या धाकाने मराठा आरक्षण आंदोलन थांबणार नसल्याचा दिला इशारा

Jarange Patil SIT News :

एसआयटी चौकशीच्या धाकाने मराठा आंदोलन चिरडता येणार नाही. 'एसआयटी चौकशी करायचीच असेल तर, भाजप नेत्यांनी केलेल्या चितावणीखोर भाषणांचीही करावी. 'शासन तुमच्या दारी' या उपक्रमात वापरलेल्या बस आणि सभांच्या खर्चाचीही करावी, असं प्रतिआव्हान सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी दिलं आहे. भाजप आमदारांच्या मागणीनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या धमकीची एसआयटी चौकशी करण्याचा आदेश दिला. त्यानंतर जरांगे समर्थक कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Rajesh Tope : असली प्रवृत्ती आमच्यात नाही! माझा काहीही संबध नाही; एसआयटी चौकशीवरुन टोपेंचे स्पष्टीकरण....

अंतरिम बजेट अधिवेशनात भाजपच्या (BJP) आमदारांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनामागे कोण आहे?. त्यांना आंदोलनासाठी पैसे कुठून येतात? असे विविध आरोप करत आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) दिलेल्या धमकीवरून एसआयटी चौकशीची मागणी केली.

त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही सरकारला जरांगेंच्या एसआयटी (SIT) चौकशीचा आदेश दिला. त्यावर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन दडपण्यासाठी दबाव आणणाऱ्या आमदारांना मतदारसंघात गेल्यावर जनतेला काय उत्तर द्यावं लागेल? असा प्रश्न करण गायकर (Karan Gaikar) यांनी उपस्थित केला.

या संदर्भात गायकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील सलग 17 दिवस उपोषण करत आहेत. त्याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पेरलेल्या लोकांकडून खोटे आरोप करून त्यांची बदनामी सुरू केली. अशा स्थितीत जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यात त्यांची काय चूक आहे? त्यांना जाणीवपूर्वक असे करण्यास भाग पाडण्यात आले, असं म्हटल्यास वावगे काय, असा प्रश्न त्यांनी केला.

'या' आमदारांचीही चौकशी व्हावी

सरकारला चौकशीच करायचीच असेल तर, मुंबै बँक घोटाळ्याचे आरोप असलेल्या आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचीही करावी, दहीहंडीच्या कार्यक्रमात मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या विधानाचीही चौकशी करावी, चिथावणी देणारे आमदार शेलार (Ashish Shelar) यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण गायकर यांनी केली.

बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या वक्तव्याचीही चौकशी झाली पाहिजे. ज्या ज्या लोकांनी मराठा आंदोलनावर बेजबाबदार टीका केली, त्या प्रत्येकाची एसआयटी झाली पाहिजे. मग सत्य बाहेर येईल. जरांगे पाटील यांना एसआयटीचा धाक दाखवून त्यांना शांत करण्याचा विचार असेल, तर तो चुकीचा आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन अजिबात थांबणार नाही. ते सुरूच राहील. त्याची किंमत भाजप आणि राज्यकर्त्यांना चुकवावी लागेल, असा इशारा गायकरांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील हे खऱ्या अर्थाने सामान्य मराठा कुटुंबातील आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेते दुखावले गेले आहेत. मात्र, संपूर्ण समाज जरांगेंच्या पाठिशी आहे. जरांगे पाटील मॅनेज होत नाही ही खरी सत्ताधारी आणि त्यांनी सोडलेल्या एजंटांची पोटदुखी आहे त्यातूनच राज्य सरकारने समाजाची फसवणूक चालवलेली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण आणि सगेसोयरे याबाबतचा अध्यादेश स्वतः आणून दिला होता. त्यासाठी समाजाने त्यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला होता. मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांनी राज्यभर होर्डिंग लावून आश्वासन पाळले, असे सांगितले नव्हते का?. आता मुख्यमंत्र्याची भाषा अचानक कशी बदलते? त्यामागे कोण आहे? मुख्यमंत्री आपला शब्द पाळणार नाहीत का? असा प्रश्न गायकर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून दोन दिवसांपूर्वी नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला होता. तेव्हा पोलिसांनी आंदोलनाविरुद्ध गुन्हे दाखल करताना फक्त मराठा आंदोलकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याची टीका अखिल भारतीय मराठा महासंघाचे शहराध्यक्ष संजय फोटो यांनी केली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil : जरांगे यांना अनेक राजकीय नेत्यांचा सपोर्ट; संगीता वानखेडेंचं SIT चौकशीला समर्थन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com