Rajesh Tope : असली प्रवृत्ती आमच्यात नाही! माझा काहीही संबध नाही; एसआयटी चौकशीवरुन टोपेंचे स्पष्टीकरण....

Manoj Jarange SIT probe : एसआयटी नेमली असेल तर दूध का दूध, पाणी का पाणी व्हावे. मला काही अडचण नाही. आम्ही मुंगी मारली नाही, एवढे आम्ही संवेदनशील आहोत.
Rajesh Tope, Devendra Fadnavis, Manoj Jarange
Rajesh Tope, Devendra Fadnavis, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : माझी काम करण्याची पद्धत जनतेला माहित आहे. या सर्व गोष्टींच्या चौकश्या होऊ दे, जर एसआयटी नेमली असेल तर दूध का दूध, पाणी का पाणी व्हावे. मला काही अडचण नाही. आम्ही मुंगी मारली नाही, एवढे आम्ही संवेदनशील आहोत. असल्या प्रवृत्या आमच्यात नाहीत! आणि आम्ही ते करत नाही. माझा काहीही संबध नाही, अशी प्रतिक्रिया माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना खालच्या पातळीवर शिवीगाळ केली आहे. तसेच अंतरवाली सराटीत झालेल्या घटनेचे षडयंत्र राजेश टोपे यांच्या कारखान्यावर झाले असल्याचे अजय बारस्कर महाराज यांनी सांगितले असून तो मुद्दा आज प्रविण दरेकर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला.

जरांगे यांचा बोलवता धनी कुणी दुसराच आहे. राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या कारखान्यावर याबाबत चर्चा झाली असल्याचा आरोप यावेळी सभागृहात करण्यात आला. यावरुन टोपे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत जर माझा यात एक टक्का सहभाग असेल तर कारवाई करा, मी राजकारणातून सन्यास घेईन, असा दावा करत एसआयटी चौकशीला माझी काही अडचण नसल्याचे सांगितले.

यावेळी राजेश टोपे म्हणाले, मराठा आरक्षणाचा लढा हा मराठा मुलांच्या न्याय हक्कासाठी आहे. गरीब मराठा समाजाचं भलं व्हावं हा त्या मागचा उद्देश आहे. मनोज जरांगे यांचा पूर्व इतिहास पाहिला तर मरठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ते आज काम करत नाहीत, तर शिवबा नावाच्या संघटनेच्या माध्यमातूनही पहिल्यापासून काम करत आहेत.

Rajesh Tope, Devendra Fadnavis, Manoj Jarange
Congress News : आसाममधील अख्खी काँग्रेस भाजपच्या वाटेवर; मंत्र्यांनीच टाकला बॉम्ब

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यावेळी सर्वाधिक 105 दिवस उपोषण त्यांनी केलं. हुतात्मा मुलांना मदत, नोकरी अशा मागण्या त्यांच्या त्यावेळी होत्या. त्यावेळी ठाकरेंना भेटण्याची मागणी जरांगेंची होती. ठाकरेंना भेटून त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. भांबेरी गावात मोठा लढा त्यांनी दिला होता. शाहगड येथेही आंदोलन केले. मी पालकमंत्री असताना ते आंदोलन करायचे, तर यावेळीही ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी यापूर्वीही आग्रही होते. आम्ही आता विरोधात आहोत म्हणून आमच्यावर आरोप होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉप्टर आमच्याच कारखान्यावर उतरले...

माझा भागात 10 किलोमीरवर ते आंदोलन करत होते. ते छोटे गाव असल्यामुळे तेथे सुविधा नव्हत्या. त्यामुळे अनेक लोक आमच्या कारखान्यावर येत होते. माझ्या मतदारसंघात ते होतं आहे, तर माणूसकीच्या नात्याने मदत केली तर चुकीचं काय? असा सवाल यावेळी राजेश टोपे यांनी यावेळी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, आपली माध्यमं तिथे होती. 5 किलोमीटरवर माझा कारखाना आहे, ज्यांची रहाण्याची व्यवस्था नाही ते कारखान्यावर यायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जरी आले तेव्हा माझ्याच कारखान्यांच्या मैदानात त्यांचे हेलीकॉप्टर उतरले होते, मग त्याचा अर्थ काहीतरी आहे का असा होतो का? असेही टोपे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जातीयवादी काही करत नाही...

जरांगे पाटील यांच्या संपर्कात थेट सरकार आहे. आम्ही लोकल आमदार म्हणून शिष्ठमंडळासोबत होतो ही आमची जबाबदारी आहे. मी सर्व समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या भागात धनगर समाजाचे आंदोलन झाले, त्यांनाही स्टाॅल उभारून मदत केली. मला अख्खा महाराष्ट्र ओळखतो, आमचा डीएनए काय आहे हे सर्वांना माहित आहे. आम्ही जातीयवादी काही करत नाही. सभागृहात जे आरोप झाले ते खोटे आणि बिनबुडाचे आहेत, असे टोपे म्हणाले.

Rajesh Tope, Devendra Fadnavis, Manoj Jarange
Ramdev Baba News : रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; पतंजलीच्या जाहिराती थांबवल्या...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com