Maharashtra Politics News : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर अडचणीत सापडले आहेत. वायकर यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी वायकरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणी सर्व संशयितांची लवकरच चौकशी होणार आहे. यासाठी त्यांना समन्स बजावण्यात येणार असल्याचं ईडीच्या सूत्रांनी म्हटलं आहे. पोलिस या प्रकरणात गुन्ह्याच्या दृष्टीने तपास करत आहेत, तर ईडीकडून मनी लाँड्रिंगनुसार चौकशी करण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून वायकर यांची चौकशी करण्यात आली होती.
मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या फाइव्ह स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा वायकर यांच्यावर आरोप आहे. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचाही आरोप वायकर यांच्यावर करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावातील जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप आहे.
वायकरांनी बांधलेल्या हॉटेलची किंमत ही 500 कोटी असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वायकरांवर आरोप केला होता. वायकरांनी सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले होते. आता गुन्हा दाखल झाल्याने रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.