Manoj Jarange Patil News : जरांगे पाटील यांना वाटतेय एकच भीती...म्हणाले सावध राहा!

Maratha Reservation issue, Jarange-Patil given alert to followers-मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले, मराठा आरक्षणाच्या मार्गात विरोधक निर्माण करतील हा अडथळा
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Issue : मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या दिशेने सत्तर टक्के काम पूर्ण झाल्याचे विश्वास आहे. मात्र, आगामी काळात मराठा आरक्षणाचे अस्वस्थ विरोधक या मार्गात खोडा घालू शकतात. त्यासाठी ते आपल्यातीलच एखाद्या नेत्याला पुढे करू शकतात, अशी काळजी त्यांना सतावते आहे. (There may be some political leaders from our own community came forward to oppose us)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) विषयासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने (Maharashtra Government) चांगले काम सुरू केल्याचे सांगितले. यासंदर्भात मराठा आरक्षणाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. येवल्याच्या (Nashik) कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही भीती व्यक्त केली.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil News : ‘येवलेकरांनो सावध राहा, येणारा काळ कसोटीचा’

या वेळी कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा समाजाला पन्नास टक्के मर्यादेत बसणारे व कायद्याच्या कसोटीवर उतरणारे आरक्षण मिळणार आहे. राज्याच्या सर्व भागात हजारो नव्हे तर लाखो पुरावे सापडले आहेत. कुणबी जातीचे पुरावे अनेक शासकीय विभागात सापडत आहेत. त्यातून सगळ्यांना आपल्या हक्काचे आरक्षण मिळू शकते. ही उपेक्षित, गरीब व गरजू लोकांना शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी संधी उपलब्ध होईल.

जरांगे पाटील यांना अद्यापही आरक्षणाच्या मार्गात अडथळे येऊ शकतात, अशी भीती आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणाचे विरोधक आपल्यातील एखाद्या राजकीय नेत्याला आपल्याच विरोधात उठवू शकतात. त्याच्या तोंडून संभ्रम निर्माण होईल अशी भाषा बोलली जाईल. त्यामुळे अशा वेळी आपली आता खरी कसोटी आहे. अशा लोकांवर बारीक नजर ठेवा, या हितशत्रूंना वेळीच नियंत्रणात आणा, असा कानमंत्र त्यांनी दिला.

आता सदैव एकजूट ठेवायची आहे. आपल्याच लेकरांच्या अन्नात माती कालवू नको, असेही विरोधकांना समजून सांगा. आपण शेतकरी आहोत. आपल्याशी खेटणार नाही, अन् खेटला तर आपले हाथ दगडावानी निबार आहेत, त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, त्यातून आरक्षण मिळावे, तेदेखील पन्नास टक्क्यांच्या आत मिळावे, अशी सबंध महाराष्ट्राची मागणी आहे.

Manoj Jarange Patil
Sharad Pawar Rally News : ...तर शरद पवार यांच्या सभेच्या आजूबाजूचे रस्ते बंद करा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com