Sharad Pawar Rally News : ...तर शरद पवार यांच्या सभेच्या आजूबाजूचे रस्ते बंद करा!

Sharad Pawar Rally News : पोलिसांची चांगलीच दमछाक होणार आहे.
Sharad Pawar Rally News :
Sharad Pawar Rally News :Sarkarnama
Published on
Updated on

हर्षल बागल -

Sharad Pawar Rally News : माढा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभेला कापसेवाडी येथे थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. सभा कापसेवाडी येथे द्राक्ष बागांच्या परिसरात होत असल्याने सभेच्या नियोजनाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. आयोजकांकडून सभा मोठ्या मैदानात न घेता द्राक्षबागेच्या मधोमध घेण्यात येत आहे, त्यामुळे जागेच्या अभावामुळे सभेला गर्दी होण्याची दाट शक्यता असून, पोलिसांची चांगलीच दमछाक होणार आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar Rally News :
NCP Pandharpur: पंढरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीपुढे पक्ष विस्ताराचे आव्हान; अभिजीत पाटलांचा लागणार कस

सभास्थळ भरल्यानंतर गर्दी पाहून आजूबाजूचे येणारे रस्ते पोलिसांनी बंद करावेत. जमणाऱ्या गर्दीची शक्यता पाहता पोलिसांनी आधीच खबरदारीचे पाऊल उचलले आहे. सभास्थळ छोटे असल्याने सभेचं नियोजनावर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पद विचारूनच आत मध्ये सोडावे, अशा काही सूचना आयोजकांनी पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांची आहे.

Sharad Pawar Rally News :
Raju Shetty Slams Ravikant Tupkar : 'स्वाभिमानी' हायजॅक करणे इतकं सोपं नाही ; शेट्टींनी तुपकरांना धुडकावलं

माढा परिसरातून येणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना याचा फटका बसू शकतो. सभेच्या अगोदर एक तास गर्दी पाहून रस्ते बंद करण्याच्या सूचना आयोजकांनी पोलिसांना दिल्यामुळे पोलिसांचीदेखील मोठी कसरत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची सभा कापसेवाडीत होत असताना तालुक्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला विचारात न घेतल्याचेही चर्चा पक्षाच्या अंतर्गत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com