Manoj Jarange Patil on Bhujbal: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला वारंवार आव्हान देत आहे. येत्या १७ नोव्हेबंरला ते जालना येथे मेळावा घेणार आहेत. त्याबाबत भुजबळ यांना त्यांच्या जिल्ह्यात येऊन उत्तर देण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. (Manoj Jarange Patil will give reply to Chhagan Bhujbal on Maratha Reservation)
मराठा समाज आरक्षणासाठी महाराष्ट्रात आंदोलन उभे करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Maratah Reservation) पुन्हा एकदा नाशिकचा (Nashik) दौरा करणरा आहे. त्यात ते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात आंदोलन केल्यावर राज्य सरकारने चाळीस दिवसांची मुदत वाढवून घेतली होती. त्यासाठी थेट निवृत्त न्यायाधीशांनी राज्य शासनाच्यानतीने प्रतिनिधीत्व केले होते. त्यामुळे हा प्रश्न आता नव्याने ऐरणीवर आला आहे.
यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्याचा दौरा सुरू केला आहे. येत्या २२ नोव्हेबरला सकल मराठा समाजातर्फे सिन्नर, नाशिक आणि इगतपुरी तालुक्याच्या सीमेवर शेणीत येथे जाहीर मेळावा होणार आहे. या मेळाव्याची अतिशय जय्यत तयारी सुरू आहे. सर्वपक्षीय नेते त्यासाठी एकत्र आले आहेत. या मेळाव्यासाठी शेत नांगरून मोठे मैदान तयार केले जात आहे. तरुण कार्यकर्त्यांत अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, प्रकास शेंडगे, माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर यांसह विविध नेते उपस्थित राहतील. या सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष्य प्रामुख्याने मराठा आरक्षण आणि जरांगे-पाटील असतील. त्या मेळाव्यातील नेत्यांच्या भाषणाला आणि प्रामुख्याने मंत्री भुजबळ यांना त्यांच्या नाशिक जिल्ह्यात येऊन जरांगे पाटील यांनी उत्तर देण्याची तायरी केली आहे. त्यामुळे हा मेळावा प्रतिष्ठेचा आहे. असंख्य युवक कार्यकर्ते त्याच्या तयारीत व्यस्त आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.